साक्रीत समाजमाध्यमावरून आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल; धार्मिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

  धुळे दर्पण न्यूज :- साक्री तालुक्यात समाज माध्यमाद्वारे आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत एकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:

  शुक्रवारी (दि. १६ मे) दुपारी १ वाजण्याच्या सुमारास साक्री तालुक्यातील दातर्ती गावात समाज माध्यमावर एक पोस्ट व्हायरल झाली. संबंधित पोस्टमध्ये हिंदू आणि मुस्लिम समाजात तेढ निर्माण होईल असा आक्षेपार्ह मजकूर आढळून आला. यामुळे गावात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

- Advertisement -

  हा प्रकार लक्षात येताच ग्रामस्थांनी तातडीने याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे सदर पोस्ट कोणाच्या अकाऊंटवरून व्हायरल झाली याचा शोध घेतला. त्यानंतर गोपाल अशोक सोनवणे (वय २९, व्यवसाय – अकाउंटंट, रा. दातर्ती, तालुका साक्री) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."

  याप्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल शांतीलाल छोटू पाटील (वय ४०) यांनी साक्री पोलीस ठाण्यात रात्री ८ वाजता फिर्याद दिली. त्यांच्या तक्रारीवरून भारतीय दंड संहिता अंतर्गत धार्मिक भावना दुखावणे व समाजात तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याबद्दल संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


  पोलीस प्रशासनाकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून नागरिकांनी समाज माध्यमांचा वापर जबाबदारीने करावा, अफवा अथवा समाजात तेढ निर्माण करणारा मजकूर प्रसारित केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देखील पोलिसांनी दिला आहे.

– धुळे दर्पण – 

(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)

(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम

- Advertisement -