धुळे दर्पण न्यूज :- धुळे शहरात सोशल मीडियाच्या गैरवापरामुळे पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. पद्मनाभ नगर येथील विशाल शालीक साळुंखे (वय ३३) या तरुणाने एका पोलिस अधिकाऱ्याच्या विरोधात लाचखोरीचे आरोप करत, अपशब्द वापरत एक व्हिडीओ तयार केला व तो आपल्या इन्स्टाग्राम खात्यावर पोस्ट केला. या प्रकारामुळे पोलिस दलाची बदनामी झाल्याचे पोलिसांचे म्हणणे असून, शहर पोलिसांनी विशालविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
या प्रकरणी धुळे शहर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश तुळशिराम पवार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. ४ एप्रिल रोजी ते विशाल साळुंखेच्या घरी गेले असताना त्याने त्याचा मोबाईल वापरून अधिकाऱ्यांची शुटिंग केली आणि त्यानंतर दोन्ही इन्स्टाग्राम खात्यांवर ती क्लिप पोस्ट केली. व्हिडीओमध्ये संबंधित पोलिस अधिकाऱ्याला ‘लाचखोर’ संबोधून शिवीगाळ करण्यात आली होती.
![]() |
| - Advertisement - |
पोलिस दलाच्या प्रतिमेला धक्का बसून समाजात पोलिसांविरोधात चिड व अविश्वास निर्माण होण्याची शक्यता असल्याने, विशाल साळुंखेविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३५१(४), २९६ आणि पोलिस (अप्रतिची भावना चेतवणे) अधिनियम १९२२ चे कलम ३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक दीपक पाटील हे करीत आहेत.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, सोशल मीडियावर गैरवर्तन करणाऱ्या पोस्ट केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते. व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य असले तरी त्याला कायद्याचे बंधन आहे, याची प्रत्येकाने जाणीव ठेवावी.
– धुळे दर्पण –
(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)
(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)
तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम
![]() |
| - Advertisement - |


