धुळे दर्पण न्यूज :- "पहलगाम घटनेनंतर संपूर्ण देशात संतापाचा स्फोट होत असतानाही सत्ताधारी पक्षाकडून केवळ दिखावा आणि श्रेय लाटण्याचे राजकारण सुरू आहे. खरे देशप्रेम, देशरक्षण करणारे नेतृत्व हे लालबहादूर शास्त्री आणि इंदिरा गांधी यांच्या रूपानेच देशाला लाभले होते. असे नेतृत्व पुढच्या शंभर वर्षात जन्माला येणे शक्य नाही," असा सडेतोड टोला शिवसेना नेते आणि माजी आमदार अनिल अण्णा गोटे यांनी केंद्र व राज्य सरकारला लगावला आहे.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
गोटे यांनी प्रसिद्धीला दिलेल्या परखड निवेदनात पहलगाम, पुलवामा आणि उटी येथील शहीद झालेल्या जवानांच्या पार्श्वभूमीवर सध्याच्या सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेवर जोरदार प्रश्न उपस्थित केले आहेत.
![]() |
| - Advertisement - |
"सर्जिकल स्ट्राईक पर्रीकरांमुळे शक्य झाला, अन्यथा केवळ ढोंगच राहिले असते"
गोटे म्हणाले की, सर्जिकल स्ट्राईकचा खरा श्रेयस्वरूप नेता म्हणजे स्वर्गीय मनोहर पर्रीकर होते. फक्त निवडणुकीसाठी राष्ट्रवादाचा गजर करणाऱ्या नेत्यांकडून अशा धाडसी निर्णयांची अपेक्षा ठेवणे म्हणजे भ्रमात जगणे होय.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
"भूलथापा व श्रेयासाठीच्या टाळ्यांनी काही साध्य होत नाही"
ते पुढे म्हणाले, "पंतप्रधानांनी तीनही सैन्यप्रमुखांना मोकळ्या हाताने कारवाईचे आदेश दिले अशी घोषणा केली जात आहे, पण प्रत्यक्षात काहीच घडत नाही. टाळ्या, लाईट शो आणि टीव्हीवरील नाट्यपूर्ण चर्चांपलीकडे काहीच शिल्लक उरलेले नाही."
![]() |
| - Advertisement - |
"शास्त्रीजींच्या धोतरातील नेतृत्वाला कुणीच गाठू शकत नाही"
गोटे यांनी लालबहादूर शास्त्री यांचे नेतृत्व, त्यांची साधी राहणी आणि १९६५ मध्ये लाहोरपर्यंत घुसलेल्या भारतीय सैन्याचे उदाहरण देत सध्याच्या सत्ताधाऱ्यांच्या नेतृत्वाची तुलनाच अशक्य असल्याचे स्पष्ट केले.
"इंदिराजींनी बांगलादेश निर्माण केला, कोणतीही धार्मिक भाषा न वापरता"
श्रीमती इंदिरा गांधी यांनी केवळ दहा दिवसांत बांगलादेश निर्माण करून भारताच्या सामरिक क्षमतेचे दर्शन जगाला घडवले, असे सांगत गोटे यांनी सध्याच्या सरकारला केवळ ‘हिंदू-हिंदुत्वा’च्या नावे राजकारण करण्याचा आरोप केला.
"पन्नास खोके, एकदम ओके – हुतात्म्यांच्या सन्मानात घृणास्पद राजकारण"
राज्य सरकारने जाहीर केलेल्या मदतीवरही गोटे यांनी ताशेरे ओढले. "हौतात्म्यांना मदतीचे आकडे जाहीर करताना सत्ताधाऱ्यांना शरमेने मान खाली घालावी लागली पाहिजे," असे ते म्हणाले.
"पाकिस्तान तुकडे करणे मतपेट्यांप्रमाणे सोपे नाही"
गोटे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका करताना म्हटले की, "मतपेट्यांमध्ये हेराफेरी करून सत्ता मिळवणे आणि पाकिस्तानचे तुकडे करणे या दोन गोष्टी एकसमान नाहीत. त्यासाठी उरात धडधडणारे खरे देशप्रेम लागते, केवळ घोषणाबाजी नव्हे."
![]() |
| - Advertisement - |
इस्रायलच्या अँटेबी कारवाईचे उदाहरण देत गोटे म्हणाले की, इस्रायलने एकही घोषणाबाजी न करता आपले नागरिक परत आणले. आपल्याकडे मात्र केवळ ‘धडा शिकवू’च्या गजरातच वेळ जातो.
"इतिहास लक्षात ठेवा – उंचीने नव्हे तर छातीने नेतृत्व ठरतं!"
"लालबहादूर शास्त्री यांची उंची फक्त ४ फूट १० इंच होती, पण त्यांची छाती मर्दाची होती. शास्त्री आणि इंदिरा यांचे नेतृत्व पुन्हा पाहायला मिळणे अशक्य आहे," असे गोटे यांनी ठामपणे सांगितले.
"आजचे सरकार वाचाळ विरांचे – आम्ही त्यांना ओळखले होतेच!"
शेवटी गोटे म्हणाले, “नव्या पिढीला या इतिहासाची जाणीव नाही आणि आजचे सरकार तो इतिहास कधीच उघडू देणार नाही. मी त्यांचा विरोधक होतो, पण आजच्या परिस्थितीवरून वाटते की तेव्हा विरोध केला ही चूक होती.”
– धुळे दर्पण –
(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)
(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)
तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम
![]() |
| - Advertisement - |




