धुळे दर्पण न्यूज :- चाळीसगाव, २ मे – शहर पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान केलेल्या तत्पर कारवाईत तब्बल ४२ किलो ५८३ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला असून, याची अंदाजे बाजारात किंमत २४ लाख ६९ हजार १५० रुपये इतकी आहे. या कारवाईत एक संशयित व्यक्ती अटकेत असून, वापरण्यात आलेली चारचाकी वाहन देखील पोलिसांनी जप्त केली आहे.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
ही कारवाई मालेगाव रोडवरील धुळे-छत्रपती संभाजीनगर बायपास चौफुली येथे करण्यात आली. नाईट राऊंड व नाकाबंदी ड्युटीवर असलेल्या चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनच्या पथकाने संशयावरून एम.एच.१२ के. एन.२३०५ क्रमांकाची पांढऱ्या रंगाची मारुती स्विफ्ट डिझायर गाडी थांबवली. तपासणीदरम्यान गाडीच्या डिक्कीमध्ये निळ्या प्लास्टिकच्या चार पिशव्यात अंमली पदार्थ असल्याचा संशय आला.
![]() |
| - Advertisement - |
याची माहिती मिळताच शहर पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर फॉरेन्सिक पथक व पंचासमक्ष तपासणी करण्यात आली. या तपासणीत सदर पदार्थ हा गांजा असल्याचे स्पष्ट झाले.
या कारवाईत पोलिसांनी शेख नदीम शेख बशीर (वय ४०, रा. गुलवानी खालदा, गल्ली नं. ३, मालेगाव, जि. नाशिक) याला अटक केली. गांजासह चारचाकी वाहन जप्त करण्यात आले आहे.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
या प्रकरणी एन.डी.पी.एस. कायदा कलम ८(उ), २०(इ), २९ अंतर्गत चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरु आहे.
![]() |
| - Advertisement - |
सदर कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, व पोलीस उपअधीक्षक राजेश चंदेल यांच्या मार्गदर्शनाखाली, आणि पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.
कारवाईत पोलीस उपनिरीक्षक संदीप घुले, योगेश माळी, कैलास पाटील, अरुण बाविस्कर, पोलीस हवालदार राहुल सोनवणे, विनोद पाटील, योगेश बेलदार, अजय पाटील, पोलीस नाईक भूषण पाटील, राकेश पाटील, नितीन आगवणे, महेंद्र पाटील, नरेंद्र चौधरी, अमोल भोसले, निलेश पाटील, नाना बच्चे, आशुतोष सोनवणे, विजू पाटील, राकेश महाजन, समाधान पाटील, दीपक चौधरी, पवन पाटील, व महिला पोलीस शिपाई सभा शेख यांचा मोलाचा सहभाग होता.
– धुळे दर्पण –
(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)
(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)
तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम
![]() |
| - Advertisement - |



