धुळे दर्पण न्यूज :- शहरात पुन्हा एकदा गुन्हेगारी प्रवृत्तीला चपराक देत धुळे पोलिसांनी गोळीबार प्रकरणातील दोघा आरोपींना ताब्यात घेऊन अमन कॅफे परिसरातून त्यांची धिंड काढली. ही घटना आणि त्यानंतरची पोलिस कारवाई शहरात चांगलीच गाजत आहे.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
१३ मे रोजी दुपारी साडे दोनच्या सुमारास साक्री रोडवरील छत्रपती संभाजीनगर भागात राहणाऱ्या शाहरुख शाहवर जुन्या वैमनस्यातून गोळीबार करण्यात आला होता. अमन कॅफे जवळ घडलेल्या या थरारक घटनेत शाहरुख जखमी झाला असून त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
![]() |
| - Advertisement - |
या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत बिलाल सुबराती शाह (रा. काझी प्लॉट) आणि हाशीम मलक अब्दुल रहमान (रा. मिल्लत नगर) यांना अटक केली. घटनास्थळावरून आरोपी पसार झाले होते, मात्र पोलिसांच्या पथकाने त्यांचा शोध घेत त्यांना काही तासांत अटक केली. अटकेवेळी बिलालकडून गावठी बनावटीचे एक पिस्तुल व दोन जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहेत.
या यशस्वी कारवाईबद्दल पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलिस अधीक्षक किशोर काळे आणि उपविभागीय पोलिस अधिकारी राजकुमार उपासे यांनी पोलिस निरीक्षक सुरेशकुमार घुसर यांच्या नेतृत्वातील पथकाचे विशेष कौतुक केले आहे.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
गुन्ह्याचा संपूर्ण घटनाक्रम आणि आरोपींची मानसिकता समजून घेण्यासाठी व जनतेमध्ये पोलिसांचा दरारा निर्माण करण्याच्या उद्देशाने, पोलिसांनी अमन कॅफे परिसरातून संशयित आरोपींची धिंड काढली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांत पोलिसांच्या कारवाईबद्दल समाधान व्यक्त होत आहे.
धुळे पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांमध्ये भीती निर्माण झाली आहे आणि भविष्यात अशा प्रकारच्या गुन्ह्यांना आळा बसेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
– धुळे दर्पण –
(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)
(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)
तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम
![]() |
| - Advertisement - |


