धुळे दर्पण न्यूज :- "तुम्हाला काही कागदपत्र कमी पडले तर, मी देतो! काय करायचे ते करून घ्या!" — अशा स्पष्ट शब्दांत माजी आमदार अनिल गोटे यांनी विरोधकांना आणि अधिकाऱ्यांना थेट आव्हान दिले आहे. दलाल मानसिकतेच्या काही अधिकार्यांनी आणि त्यांच्या पाठीराख्यांनी सुरू केलेल्या राजकीय द्वेषातून प्रेरित मोहिमेला उत्तर देत त्यांनी हे परखड पत्रक प्रसिद्ध केले आहे.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
दलाल अधिकाऱ्यांविरोधात आवाज उठवताच लगेच हलकल्लोळ
अनिल गोटे यांनी आपल्या पत्रकात म्हटले आहे की, "मी जिल्ह्यातील गोर-गरीबांच्या, वंचितांच्या हक्कांसाठी आवाज उठवताच, काही दलाल प्रवृत्तीच्या अधिकाऱ्यांना अचानक जाग आली. रोजगार हमी योजनेच्या कामावर कसे अधिकारी झडप घालतात, तसेच हे लोक एकदम सरसावले."
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
दहा वर्षांपूर्वीच्या तक्रारींचा शोध, कोर्टात चकरा
गोटे यांनी सांगितले की, त्यांच्या विरोधात दहा वर्षांपूर्वीच्या जुन्या तक्रारी, तसेच विविध आंदोलने आणि त्यासंबंधी धुळे न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणांची कागदपत्रे गोळा करण्यासाठी पोलीस कर्मचारी कोर्टातून कोर्टात चकरा मारत आहेत. एवढेच नव्हे तर, "फोनवर मी कुणाशी काय बोलतो, यावरही बारीक लक्ष ठेवले जात आहे," असा आरोप त्यांनी केला.
![]() |
| - Advertisement - |
"माझा विरोधकांच्या चौकशीला पाठिंबा!"
या सगळ्या कारवाईकडे गोटे यांनी सहजतेने पाहत, "माझा या सगळ्या चौकशांना संपूर्ण पाठिंबा आहे. तुम्हाला जे करायचे आहे ते करून घ्या," असे जाहीर आव्हानच दिले. त्यांच्या बोलण्यात रोखठोकपणा आणि आत्मविश्वास स्पष्ट जाणवत होता.
"मी आधीही सरकारचा ससेमिरा अनुभवला आहे"
गोटे यांनी आपल्या राजकीय प्रवासाचा उल्लेख करत म्हटले की, "मी भाजप आणि शिवसेनेला पाठिंबा दिला म्हणून पूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारने माझ्यावर सीबीआय, अँटी करप्शन अशा असंख्य चौकशा लादल्या होत्या. त्या काळात मी चार वर्षे तुरुंगवासही भोगला. तरीही मी सर्व चौकशीला सामोरा गेलो आणि निर्दोष सिद्ध झालो."
"वयाच्या ७८ व्या वर्षी तुम्हाला अजून काय मिळणार?"
आता वयाच्या ७८ व्या वर्षी माझ्याकडे काय उरले आहे हे शोधून तुम्हाला काही मिळणार नाही, असा प्रश्न त्यांनी उपहासात्मकपणे विचारला. "या फालतू उद्योगांमध्ये वेळ वाया घालवण्यापेक्षा, गरजू, गरीब, दलित, आदिवासी, दिनदुबळ्यांना मदत करा. निदान त्यांचे नातेवाईक तरी तुम्हाला आशीर्वाद देतील," अशा शब्दांत त्यांनी सत्ताधाऱ्यांना सणसणीत टोला लगावला.
– धुळे दर्पण –
(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)
(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)
तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम
![]() |
| - Advertisement - |


