धुळे दर्पण न्यूज :- धुळे शहराच्या मध्यवर्ती भागातील ‘स्वस्तिक टॉकीज’ची अंदाजे चार कोटी रुपये किमतीची मालमत्ता बनावट कागदपत्रांच्या आधारे परस्पर विक्री करून मालकी हक्क मिळवण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सिटी सर्व्हे विभागातील तत्कालीन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह प्रमुख सहा व्यक्तींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा धुळे शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
या प्रकरणी अकोला येथील रेखा योगेश शाह (वय ४६), रा. फ्लॅट नं. १०३, लोहिया नगर, मूळ रा. आग्रा रोड, धुळे यांनी फिर्याद दिली आहे. त्यांनी त्यांच्या फिर्यादीत गंभीर आरोप करताना नमूद केले आहे की, फिर्यादीसह अन्य वारसदारांचा हक्क असलेल्या मालमत्तेवर बनावट प्रतिज्ञापत्र, खोटे जबाब, खोटे अर्ज सादर करून आणि सिटी सर्व्हे विभागातील कर्मचाऱ्यांना हाताशी धरून मालमत्तेचा बनावट उतारा तयार करण्यात आला.
![]() |
| - Advertisement - |
फिर्यादीत म्हटले आहे की, प्रदीप हिरालाल शाह, सुरेश हिरालाल शाह, उज्वला हिरालाल शाह, रजनी राजेंद्र शाह (सर्व रा. स्वस्तिक हार्डवेअर, आग्रा रोड, धुळे), अभिषेक राजेंद्र शाह (मुंबई) आणि मोक्षा उर्फ मोक्षा विराज शाह (नाशिक) या आरोपींनी संगनमत करून सि.स.नं. १४६६/१ च्या जागेची बनावट नकाशा तयार करून खरेदीखता अंतर्गत सदर जमीन स्वतःची असल्याचे भासवून ३१ मार्च २०२५ रोजी दस्त क्र. १५३३/२०२५ अन्वये परस्पर विक्री केली.
विशेष म्हणजे, ही मालमत्ता सि.स.नं. १४६६/४ या स्वस्तिक टॉकीजच्या मूळ जागेची असून ती सि.स.नं. १४६६/१ मध्ये असल्याचे भासवण्यात आले. यासाठी चतु:सीमा, वर्णन आणि खरेदीखतामध्ये चुकीची माहिती वापरण्यात आली. इतकेच नव्हे, तर खरेदीखत खोट्या आधारावर नोंदणीसाठी सादर करून निबंधक कार्यालयाकडून दस्त नोंदवून घेण्यात आला.
![]() |
| - Advertisement - |
या प्रकारामुळे मूळ जागेचे हक्क असणाऱ्या व्यक्तींना आर्थिक नुकसान झाले असून एकूण अंदाजे चार कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या गंभीर प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी अमोल दिवटे करत असून, आणखी काही दोषींचा पर्दाफाश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
तपास सुरू, अधिकाऱ्यांची जबाबदारी संशयाच्या भोवऱ्यात
या प्रकरणात सिटी सर्व्हे कार्यालयातील तत्कालीन अधिकाऱ्यांनी कशी भूमिका बजावली, बनावट नकाशा आणि उतारा तयार करण्यात त्यांनी कशी मदत केली याचा तपास सुरू असून, सरकारी यंत्रणेतील काहीजणांची भूमिका संशयास्पद ठरत आहे. लवकरच संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात येणार आहे.
– धुळे दर्पण –
(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)
(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)
तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम
![]() |
| - Advertisement - |



