धुळे दर्पण न्यूज :-  पारोळा रोडवरील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशांना पायदळी तुडवत अवैध गोतस्करीचे जाळे उभे राहत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मध्यरात्री धडाकेबाज कारवाई करत आमदार अनुप अग्रवाल यांनी बाजार समितीत छापा टाकून १२७ पेक्षा अधिक गोवंशांची सुटका केली. या कारवाईमुळे प्रशासनातील हलगर्जीपणा आणि कायद्यातील घोर उल्लंघन उघड झाला आहे.

Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:

  मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास आमदार अनुप अग्रवाल यांनी भाजप ओबीसी आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष हिरामण गवळी, भिकन वराडे, धीरज परदेशी, श्री शिवछत्रपती गोरक्षा जन आंदोलनचे प्रणील मंडवलिक व प्राणीन फाउंडेशनच्या नेहा पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली भुराभाऊ माळी व गोरक्षकांच्या पथकासह अचानक बाजार समितीत धाड टाकली. यावेळी शेकडो जनावरे ईअर टॅगशिवाय खरेदी-विक्रीसाठी ठेवण्यात आलेली आढळली. या जनावरांची अवैध वाहतूक करून त्यांना कत्तलीसाठी नेण्याचा प्रयत्न केला जात होता, असा आरोप आहे.

- Advertisement -

१२७ जनावरांची सुटका, नवकार गोशाळेत सुरक्षित हलवा

  पोलिस प्रशासनाला माहिती मिळताच जिल्हा पोलिस उपअधीक्षक राजकुमार उपासे, आझादनगर पोलिस निरीक्षक निवृत्ती पवार, देवपूरचे सहाय्यक निरीक्षक तुषार देवरे, गुन्हे शाखेचे निरीक्षक श्रीराम पवार, तसेच चाळीसगाव रोडचे उपनिरीक्षक शरद लेंडे व त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी ११ गायी, ५६ बैल, ४९ गोहे, ९ वासरे, २ पारडू अशी एकूण १२७ जनावरे ताब्यात घेतली. ही सर्व जनावरे चाळीसगाव रोडवरील नवकार गोशाळेत हलविण्यात आली आहेत.


जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली

  जिल्हाधिकाऱ्यांनी २५ एप्रिल २०२४ रोजी दिलेल्या आदेशानुसार, बाजार समितीत विक्रीसाठी येणाऱ्या प्रत्येक जनावराच्या कानाला १२ अंकी ईअर टॅग असणे आवश्यक आहे. मात्र, या आदेशाचे सर्रास उल्लंघन करत प्रशासनाने बिनटॅगची जनावरे बाजारात विक्रीसाठी आणली होती. या निष्काळजीपणामुळे बाजार समितीच्या अधिकाऱ्यांनीच कायद्याला दुजोरा दिला आहे, असे स्पष्ट दिसून येते.

"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."

सूत्रधारास अटक; बाजार समिती प्रशासनावर गुन्हे दाखल होणार?

  या संपूर्ण प्रकारात एका मुख्य सूत्रधाराला अटक करण्यात आली असून, आमदार अग्रवाल यांनी संबंधित बाजार समितीचे अधिकारी व कर्मचारी यांच्यावरही कठोर कारवाई करावी, अशा सूचना पोलिसांना दिल्या आहेत. अद्याप कोणावर गुन्हा दाखल करण्यात आलेला नसला, तरी पोलीस तपास सुरू आहे.

- Advertisement -
गोरक्षकांत समाधानाची लाट

  या कारवाईमुळे गोसेवा करणाऱ्या संस्थांमध्ये समाधानाची भावना आहे. अनेकांनी आमदार अनुप अग्रवाल यांचे अभिनंदन केले असून, अशा कारवाया सातत्याने व्हाव्यात अशी मागणीही त्यांनी केली आहे.


आमदार अग्रवाल यांचे कठोर कारवाईचे आदेश: नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी

  धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत बेकायदेशीररीत्या जनावरांची खरेदी-विक्री होत असल्याचे उघड झाल्यानंतर आमदार अनुप अग्रवाल यांनी पोलिसांना कठोर कारवाईचे स्पष्ट आदेश दिले. त्यांनी सांगितले की, जिल्हाधिकाऱ्यांच्या २५ एप्रिल २०२४ च्या आदेशानुसार प्रत्येक जनावराच्या कानाला १२ अंकी ईअर टॅग असणे आवश्यक आहे, आणि त्याची ऑनलाईन नोंदणीही अनिवार्य आहे.


  असे असूनही बाजार समितीमध्ये हा नियम पायदळी तुडवला गेला. ईअर टॅगशिवाय जनावरे बाजारात आणली गेली व त्यांची बेकायदेशीर विक्री सुरू होती. आमदार अग्रवाल यांनी हे गंभीर प्रकार मानत प्रशासनानेच कायद्याला थट्टेचे साधन बनवले आहे, अशी घणाघाती टीका केली. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, बाजार समितीचे संबंधित अधिकारी, कर्मचारी तसेच अवैध व्यवहारातील मुख्य सूत्रधारांविरोधात त्वरित आणि कठोर कारवाई केली पाहिजे.


– धुळे दर्पण – 

(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)

(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम

- Advertisement -