धुळे दर्पण न्यूज :- भाजपने राज्यातील संघटनात्मक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी काही जिल्हाध्यक्षांची घोषणा केली. धुळे जिल्ह्यातील महानगर आणि ग्रामीण विभागासाठी नवीन जिल्हाध्यक्ष नेमण्यात आले असून, गजेंद्र अंपळकर यांना महानगर जिल्हाध्यक्षपदी पुन्हा संधी देण्यात आली आहे. तर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी रामकृष्ण उर्फ बापू खलाणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
रामकृष्ण खलाणे हे भाजप किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष असून, याआधी ते जिल्हा परिषदेमध्ये कृषी सभापती पद भूषवले आहे. विद्यमान ग्रामीण जिल्हाध्यक्ष बबन चौधरी यांना पक्ष नियमानुसार चार वेळा संधी मिळाल्यानंतर आता नवीन चेहरा म्हणून खलाणे यांच्यावर विश्वास दाखवण्यात आला आहे. त्यांच्या निवडीनंतर धुळे तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आला.
![]() |
| - Advertisement - |
महानगर जिल्हाध्यक्षपदी गजेंद्र अंपळकर यांची फेरनियुक्ती हे त्यांच्या कार्याची दखल असल्याचे मानले जात आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली शहरातून भाजपचे आमदार निवडून आले असून, त्यांनी पक्षासाठी ४ कोटी रुपये किमतीची जागा दान दिली होती. त्या जागेवर चाळीसगाव रोडवर चार मजली अत्याधुनिक पक्ष कार्यालय उभारण्यात आले आहे.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
या नियुक्त्यांचे माजी मंत्री डॉ. सुभाष भामरे, तसेच जिल्ह्यातील आजी-माजी आमदार आणि पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी स्वागत करत दोन्ही नविन जिल्हाध्यक्षांना शुभेच्छा दिल्या. भाजपच्या या संघटनात्मक निर्णयामुळे जिल्ह्यात नवचैतन्य निर्माण झाले असून, आगामी निवडणुकांसाठी ही नियुक्ती महत्वाची ठरेल, असे मत कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे.
– धुळे दर्पण –
(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)
(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)
तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम
