धुळे दर्पण न्यूज :- धुळे-नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या महाराष्ट्र विधिमंडळ अंदाज समितीच्या स्वागतासाठी प्रशासनाकडून ‘वर्गणी’ स्वरूपात जमा करण्यात आलेल्या सुमारे साडेपाच कोटी रुपयांची रोकड शासकीय विश्रामगृहात ठेवण्यात आल्याचा गंभीर आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही रोकड समिती अध्यक्ष अर्जुन खोतकर यांचे स्वीय सहाय्यक किशोर पाटील यांच्या नावे बुक असलेल्या खोली क्रमांक १०२ मध्ये ठेवण्यात आली होती.

- Advertisement -

  या आरोपाची गंभीरता लक्षात घेता बुधवारी रात्री १२ वाजता प्रशासन आणि पोलिस यंत्रणा हलली, व गुलमोहोर शासकीय विश्रामगृहातील संबंधित खोलीचे कुलूप कटरच्या साहाय्याने तोडून तपासणी करण्यात आली. मात्र, यावेळी नेमकी किती रक्कम सापडली याबाबत प्रशासनाने कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."

गोटेंचा आरोप: विश्रामगृहात समितीसाठी साडेपाच कोटींची ‘वर्गणी’ ठेवली

  शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) चे माजी आमदार अनिल गोटे यांनी या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर बुधवारी संध्याकाळी सात वाजल्यापासून विश्रामगृहाच्या रूम नंबर १०२ बाहेर ठिय्या मांडला. त्यांनी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि सार्वजनिक बांधकाम विभागाशी संपर्क साधून या प्रकरणाची त्वरित चौकशी करण्याची मागणी केली. मात्र, रात्रभर कोणतीही अधिकृत कारवाई न झाल्याने गोटेंनी आक्रमक भूमिका घेतली.

Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:

कटरने कुलूप तोडले, पिशवीतून रोकड सापडली

  अखेर रात्री १२ वाजता अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, तहसीलदार वैशाली हिंगे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आर. आर. पाटील यांच्यासह पोलीस अधिकारी आणि शिवसेनेचे दोन पदाधिकारी रूम क्रमांक १०२ मध्ये दाखल झाले. खोलीचे कुलूप कटरने तोडण्यात आले आणि कपाटात ठेवलेल्या पांढऱ्या रंगाच्या पिशवीतून मोठ्या प्रमाणावर रोकड सापडली. रोकड मोजण्यासाठी नोटा मोजणीचे मशीनही मागवण्यात आले.

- Advertisement -

प्रशासनाकडून मौन; समिती अध्यक्षांचा संपर्क अपयशी

  या प्रकरणावर प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. धुळे दर्पण ’ने या प्रकरणाबाबत समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे ही रोकड नक्की कुणाच्या आदेशाने, कोणत्या उद्देशाने ठेवण्यात आली, याचे उत्तर सध्या गुलदस्त्यात आहे.

- Advertisement -
राजकीय भूकंपाची शक्यता

  या घटनेमुळे धुळे जिल्ह्यात मोठा राजकीय भूकंप घडण्याची शक्यता असून, विरोधी पक्षांनीही या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. गोटे यांनी राज्य सरकारवर थेट आरोप करत सांगितले की, "ह्या प्रकारातून स्पष्ट होते की, विधिमंडळ समित्यांचा दौरा म्हणजे केवळ धनसंपत्ती गोळा करण्याचा एक कार्यक्रम झाला आहे."

- Advertisement -

पुढे काय...?

  या प्रकरणाची आर्थिक गुन्हे शाखेच्या माध्यमातून चौकशी होणार की नाही, ही बाब महत्वाची ठरणार आहे. तसेच, समिती अध्यक्ष आणि प्रशासनाकडून खुलासा अपेक्षित असून, गोटे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशारा दिला आहे.


– धुळे दर्पण – 

(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)

(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम

- Advertisement -