धुळे दर्पण न्यूज :- दहावी परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी फेरपरीक्षेची (पुरवणी परीक्षा) ऑनलाइन अर्ज प्रक्रिया १५ मेपासून सुरू झाली आहे. विद्यार्थ्यांना २८ मे २०२५ पर्यंत बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज सादर करता येणार आहे. यानंतर जून-जुलै महिन्यात परीक्षा होणार असून, त्या आधारे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य ठरणार आहे.

"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."

🔹 अकरावी प्रवेशासाठी एटीकेटीचा पर्याय

  दहावीत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक बाब म्हणजे ‘ATKT’ (Allowed To Keep Terms) नियम लागू करण्यात आला आहे. या नियमानुसार, विद्यार्थी अकरावीत प्रवेश घेऊ शकतात, मात्र पुरवणी परीक्षेत पुन्हा अनुत्तीर्ण झाल्यास प्रवेश आपोआप रद्द केला जाईल. त्यामुळे पालक व विद्यार्थ्यांनी या संधीचे महत्त्व ओळखून अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे.

- Advertisement -

🔹 निकालात मोठी घसरण – कॉपीमुक्त मोहिमेचा परिणाम?

  यंदा जळगाव जिल्ह्याचा निकाल ९३.९७%, धुळे जिल्ह्याचा ८७.१०%, तर नंदुरबार जिल्ह्याचा निकाल ८८.१९% लागला आहे. यातील धुळे व नंदुरबार जिल्ह्याच्या निकालात मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे ७ टक्क्यांची घट झाली आहे. शिक्षण विभागाच्या म्हणण्यानुसार, यंदा कॉपीमुक्त परीक्षा अभियान राबवण्यात आले होते. अनेक परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही, पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे काही केंद्रांवरील विद्यार्थ्यांना कॉपी करता न आल्याने निकालात घट झाली असल्याचे स्पष्ट होत आहे.

🔹 फेरमूल्यांकनासाठीही ऑनलाइन सुविधा

  विद्यार्थ्यांना त्यांच्या उत्तरपत्रिकेचे फेरमूल्यांकन हवे असल्यास त्यासाठीही ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. मात्र, त्यासाठी आधी उत्तरपत्रिकेची छायाप्रत मिळवणे आवश्यक आहे. छायाप्रत मिळाल्यापासून ५ कार्यालयीन दिवसांच्या आत फेरमूल्यांकन अर्ज आणि शुल्क संबंधित विभागाकडे सादर करणे आवश्यक आहे.

Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:

🔹 गुणसुधारासाठी तीन संधी

  दहावी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, आपले गुण व श्रेणी सुधारण्यासाठी बोर्डाने पुढील तीन संधी उपलब्ध करून दिल्या आहेत.
जून-जुलै २०२५
फेब्रुवारी-मार्च २०२६
जून-जुलै २०२६

विद्यार्थ्यांनी या संधींचा लाभ घेण्यासाठी वेळेत अर्ज सादर करावा, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.

- Advertisement -

📌 अर्जासाठी संकेतस्थळ:

📢 महत्त्वाचे:
▪ अर्ज करण्याची शेवटची तारीख – २८ मे २०२५
▪ अकरावीत प्रवेश तात्पुरता – ATKT अंतर्गत
▪ पुरवणी परीक्षा – जून-जुलै २०२५

– धुळे दर्पण – 

(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)

(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम

- Advertisement -