धुळे दर्पण न्यूज :- धुळे-सुरत महामार्गावरील कोंडाईबारी घाटात बुधवारी सायंकाळी एक भीषण अपघात घडला. धुळे येथून सुरतच्या दिशेने निघालेली प्रवासी एस.टी. बस महामार्गाच्या वरील टप्प्यावरून अंदाजे १५ फूट खाली कोसळल्याने ही दुर्घटना घडली. या भीषण अपघातात किमान २५ प्रवासी जखमी झाले असून, त्यापैकी पाच प्रवाशांची प्रकृती अत्यवस्थ असल्याची माहिती आहे.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा.
अपघातग्रस्त बस (क्रमांक MH-20 BL-4049) सायंकाळी पाच वाजून सत्तावीस मिनिटांनी धुळे येथून सुरतकडे निघाली होती. कोंडाईबारी घाटातील पहिल्या वळणावर ओव्हरटेक करत असलेल्या ट्रकने बसला अचानक कट मारल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस महामार्गाच्या कडेला असलेल्या उंचवट्यावरून सुमारे ८ ते १० फूट खाली कोसळली. हा उतार तीव्र असल्याने बस दोनदा पलटी मारून उलटली. या घटनेत बसचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
बसमध्ये एकूण ५०हून अधिक प्रवासी होते. अपघातात २५ ते ३० प्रवाशांना किरकोळ ते मध्यम स्वरूपाच्या दुखापती झाल्या असून, गंभीर जखमींना तातडीने जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. विसरवाडी, नवापूर व साक्री येथून रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. प्राथमिक उपचारासाठी काही जखमींना विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, तर अत्यवस्थ जखमींना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. काही गंभीर प्रवाशांना पुढील उपचारासाठी धुळे शासकीय रुग्णालयात देखील पाठवण्यात आले.
![]() |
| - Advertisement - |
घटनास्थळी विसरवाडी पोलीस मदत केंद्र, ग्रामीण पोलीस, स्थानिक नागरिक व वाहनचालकांनी तातडीने मदतीचा हात पुढे करत बचावकार्य सुरू केले. भाजपाचे अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष एजाज शेख हेही घटनास्थळी उपस्थित होते. त्यांनी स्वतः जखमींना बाहेर काढण्यासाठी मदत केली आणि रुग्णवाहिकांसाठी संपर्क साधला.
विसरवाडी ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले की, सात प्रवाशांना किरकोळ इजा झाली असून, पाच जणांची स्थिती गंभीर आहे. या अपघाताची माहिती मिळताच विसरवाडी पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून, ट्रक चालकाचा शोध सुरू आहे. अपघात नेमका कशामुळे झाला याचा तपास सुरू आहे.
धुळे जिल्ह्याच्या महत्वपूर्ण अपडेट्स जाणून घेण्यासाठी आत्ताच जॉईन करा Group 2
या भीषण अपघातामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. एका प्रवाशाने सांगितले की, "बस अजून एक पलटी मारली असती, तर आम्ही थेट खोल दरीत गेलो असतो. दैव बलवत्तर म्हणून आम्ही वाचलो." घटनास्थळी अजूनही तपासणीचे आणि मदत कार्याचे काम सुरू आहे.
– धुळे दर्पण –
(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)
(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)
तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम
![]() |
| - Advertisement - |


