धुळे दर्पण न्यूज :- शहरातील वर्दळीच्या भागात असलेल्या आग्रारोडवरील एका दुकानात मंगळवारी रात्री भीषण आग लागल्याने एकच खळबळ उडाली. रात्री सव्वादहाच्या सुमारास लागलेली ही आग इतकी भयावह होती की, काही क्षणातच दुकानात ठेवलेला सारा माल भस्मसात झाला. विशेष म्हणजे, दुकानासमोर उभी असलेली दुचाकीही आगीत जळून खाक झाली.

Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:

  या घटनेमुळे परिसरात तातडीने अफरातफर निर्माण झाली. घटनास्थळी उपस्थित काही नागरिकांनी तत्काळ पोलिसांना व महापालिकेच्या अग्निशमन दलाला माहिती दिली. काही वेळातच पोलिस आणि अग्निशमन विभागाचे पाच बंब घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अथक प्रयत्न करून आग आटोक्यात आणण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवले.

"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."

  स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दुकान अनिल बडगुजर यांचे असून, आगीत दुकानातील सगळा माल आणि साहित्य पूर्णतः जळून गेले. यामुळे लाखोंचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, यासंदर्भात पोलिसांकडून अधिकृत दुजोरा अद्याप देण्यात आलेला नाही.

- Advertisement -

  या आगीत दुकानासमोर उभी असलेली दुचाकीही आगीत होरपळली असून, विद्युत खांबावरील वायर जळून लोंबकळत असल्याचेही पाहायला मिळाले. त्यामुळे काही काळ त्या परिसरातील वीजपुरवठाही खंडित करण्यात आला होता.


  दरम्यान, शॉर्टसर्किटमुळेच ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

– धुळे दर्पण – 

(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)

(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम

- Advertisement -