धुळे दर्पण न्यूज :- राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या शिरपूर येथील पथकाने मध्यप्रदेशातून बेकायदेशीरपणे आणली जात असलेली बिअर पकडण्यात मोठे यश मिळवले आहे. सापळा रचून पाठलाग करत पथकाने सुमारे ७ लाख ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. मात्र या प्रकरणातील वाहनचालक अंधाराचा फायदा घेत जंगलात पसार झाला आहे.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
घटनेचा सविस्तर तपशील असा आहे की, शिरपूर येथील राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक देविदास नेहूल हे त्यांच्या पथकासह मध्यप्रदेश सीमेलगतच्या भागात गस्तीवर असताना त्यांना एमएच-१६ एटी-०८२३ या क्रमांकाच्या महिंद्रा मॅक्स वाहनामधून बेकायदेशीर बिअरची वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती मिळाली.
![]() |
| - Advertisement - |
या माहितीनुसार तात्काळ हालचाल करत पथकाने शिरपूर तालुक्यातील वाकपाडा-बोरपाणी रस्त्यावर बोरपाणी शिवारात सापळा रचला. काही वेळातच संशयित वाहन त्या दिशेने येताना दिसल्यावर पथकाने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र वाहनचालकाने गाडी न थांबवता भरधाव वेगाने बोरपाणी गावाच्या दिशेने पलायन केले.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने त्याचा थरारक पाठलाग करत दबाव वाढवला. शेवटी वाहनचालकाने जंगलाच्या दिशेने जाणाऱ्या एका रस्त्याच्या कडेला गाडी थांबवली आणि अंधाराचा फायदा घेत तो जंगलात पळून गेला. त्याचा शोध सुरु आहे.
पथकाने वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये मध्यप्रदेश राज्यात निर्मित व विक्रीसाठी असलेली पॉवरकुल स्ट्राँग बिअर आढळून आली. एकूण २ लाख ३४ हजार रुपये किंमतीचा बिअर साठा आणि वाहनासह एकूण ७ लाख ३४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
![]() |
| - Advertisement - |
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्कच्या अधीक्षक सौ. स्वाती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक देविदास नेहूल, के. एम. गोसावी, रविंद्र देसले यांच्या पथकाने केली.
या प्रकरणी पुढील तपास सुरु असून, बेकायदेशीर मद्य वाहतुकीच्या प्रकरणांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पथक सातत्याने नजर ठेवून आहे. अशा प्रकारच्या कारवायांमुळे अवैध मद्य व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
– धुळे दर्पण –
(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)
(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)
तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम


