धुळे दर्पण न्यूज :- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी गुरुवारी अधिकाऱ्यांना ठणकावून सांगितले की, "आपत्तीच्या काळात कोणताही अधिकारी वेळेवर प्रतिसाद देत नसेल, तर त्याच्यावर थेट कारवाई केली जाईल!" मान्सूनपूर्व तयारीसंदर्भात आयोजित बैठकीत जिल्हा यंत्रणेला सज्ज राहण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले.

Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:

  या बैठकीस अप्पर जिल्हाधिकारी सुभाष बोरकर, निवासी उपजिल्हाधिकारी महेश शेलार, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, उपजिल्हाधिकारी संदीप पाटील, पोलिस उपअधीक्षक विश्वजीत जाधव आदी अधिकारी उपस्थित होते.

- Advertisement -

🔍 ठळक मुद्दे – जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना व इशारे:

आपत्ती व्यवस्थापन आराखडा अद्याप न दिलेल्या विभागांनी तातडीने तो सादर करावा

प्रत्येक धरण, प्रकल्पासाठी समन्वयक अधिकारी नियुक्त करावेत

धोकादायक इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट त्वरित करावे – महापालिका व नगरपालिकांना आदेश

पूररेषांची पाहणी, शोध-बचाव साहित्याची तपासणी करण्याचे आदेश

नदीकाठच्या गावांमध्ये आपत्ती व्यवस्थापन समित्या गठीत करण्याचे निर्देश

वेळेवर कृती न करणाऱ्यांविरोधात कठोर शिस्तभंगात्मक कारवाई


🗣️ "कठोर कारवाई म्हणजे केवळ शाब्दिक इशारा नाही; वेळ आल्यास निर्णय घेतले जातील!" – जिल्हाधिकारी पापळकर

  जिल्हाधिकारी पापळकर यांनी अधिकाऱ्यांना खडसावत सांगितले की, आपत्ती काळात विलंब, हलगर्जी किंवा समन्वयाचा अभाव ही चूक नाही, तर गंभीर जबाबदारीचा भंग आहे. त्यामुळे प्रत्येक विभागाने सज्जता आणि उत्तरदायित्वाचे भान ठेवावे, अन्यथा कारवाई अटळ आहे.

– धुळे दर्पण – 

(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)

(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम

- Advertisement -