धुळे दर्पण न्यूज :- "महायुती सरकार हे तळागाळातील जनतेसाठी कार्य करणारे सरकार आहे. प्रत्येक शासकीय योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे, यातूनच जनतेचा सरकारवरील विश्वास दृढ होतो," असे प्रतिपादन आमदार राघवेंद्र (राम) भदाणे यांनी केले.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
धुळे तालुक्यातील देऊर गटातील इमारत व बांधकाम कामगार कल्याण विभागाच्या योजनेंतर्गत शनिवार, १ जून रोजी नगाव येथील आण्णासाहेब द. वा. पाटील शैक्षणिक संकुल येथे संसारोपयोगी भांड्यांच्या संचाचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाचे औचित्य लाभार्थ्यांच्या हस्ते आमदार राम भदाणे यांनी केले.
![]() |
| - Advertisement - |
कामगारांच्या सेवेसाठी समर्पित उपक्रम
इमारत व बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या वतीने धुळे तालुक्यातील हजारो नोंदणीकृत बांधकाम मजुरांना शासकीय योजनेअंतर्गत गृहवापरासाठी लागणाऱ्या भांड्यांचा संच मोफत देण्यात येत आहे. याच उपक्रमाची सुरुवात देऊर गटापासून करण्यात आली.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
आमदार राम भदाणे यांच्या पुढाकाराने याअगोदर मोफत नोंदणी शिबिरे आयोजित करून कामगारांची ऑनलाइन नोंदणी करण्यात आली होती. त्यानंतर मंजूर लाभार्थ्यांची यादी तयार करून नियोजनबद्ध स्वरूपात गटानुसार संचांचे वितरण सुरू करण्यात आले.
जनतेशी जोडणारे सरकार – आमदार भदाणे यांचा विश्वास
कार्यक्रमात आमदार राम भदाणे म्हणाले, "महायुती सरकार हे जनतेचे सरकार आहे. शासकीय योजना ही केवळ कागदावर न राहता, त्या गरजू पर्यंत पोहचवण्याचे कार्य आम्ही प्राधान्याने करत आहोत. बांधकाम कामगारांसाठी दिला जाणारा भांड्यांचा संच हा त्यांच्या दैनंदिन जीवनात नक्कीच उपयुक्त ठरेल."
![]() |
| - Advertisement - |
ते पुढे म्हणाले, "तालुक्यातील प्रत्येक गटात अशाच पद्धतीने वितरण करण्यात येणार असून, एकाही पात्र लाभार्थ्याला वंचित ठेवले जाणार नाही, यासाठी प्रयत्नशील राहणार आहोत."
भाजप पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
या कार्यक्रमाला भाजपा जिल्हा ग्रामीण अध्यक्ष बापू खलाणे, उपाध्यक्ष प्रा. अरविंद जाधव, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब भदाणे, भाऊसाहेब देसले, देवेंद्र पाटील, नेर मंडळ अध्यक्ष छोटू मासुळे, फागणे मंडळ अध्यक्ष दिनेश माळी, शिरुड मंडळ अध्यक्ष प्रविण पवार, वलवाडी मंडळ अध्यक्ष रविंद्र निकम, तसेच अशोक शुडके, भैयासाहेब देवरे, सागर देवरे, भटू देशमुख, हरीश शेलार, श्रीराम मासुळे आणि देऊर गटातील अनेक भाजप पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कामगारांचे समाधान
भांडी संच मिळाल्याने लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त केले. "आम्हाला हा संच मिळाला याचा खूप आनंद आहे. यामुळे आमच्या घरच्या गरजा भागणार आहेत," अशा भावना अनेक मजुरांनी व्यक्त केल्या.
– धुळे दर्पण –
(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)
(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)
तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम


