धुळे जिल्हा मराठा सेवा संघाच्या वतीने दहावी, बारावी व सीईटी परीक्षेत विशेष यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ नुकताच धुळे येथील स्व. उत्तमराव बेडसे सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे राज्य सहसचिव मा. चंद्रशेखर भदाणे होते.
![]() |
| - Advertisement - |
कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून इतिहास संशोधक व प्रख्यात व्याख्याते प्रा. डॉ. लीलाधर पाटील यांनी विद्यार्थ्यांसह पालकांना मार्गदर्शन करताना "ज्ञानसत्ता हीच खरी मुख्य सत्ता" असल्याचा ठाम विश्वास व्यक्त केला. "विद्यार्थ्यांनी फक्त गुणांपुरते शिक्षण न घेता, समाजासाठी सकारात्मक विचार निर्माण करणारे ज्ञान आत्मसात करावे," असे ते म्हणाले.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
या कार्यक्रमास रा.रा.पो.बल गट क्र. ६ चे समादेशक प्रभाकर शिंदे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. वाय. बहिरम, हृदयविकार तज्ञ डॉ. दीपक शिंदे, उद्योजक बाळासाहेब भदाणे, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष संदीप पाटील, सचिव एस. एम. पाटील, कार्याध्यक्ष मोहन देसले, सहसचिव प्रा. डॉ. सुनील पवार, तालुका अध्यक्ष अविनाश पवार, वधू-वर कक्षाचे अध्यक्ष पी. एन. पाटील, शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष बी. ए. पाटील, सहसचिव संजय पाटील, राजेंद्र मोरे, फागणे एज्युकेशनचे चेअरमन मधुकर पाटील, सकल मराठा समाज मंडळाचे सुनीलभाऊ पाटील व साहेबराव यांची उपस्थिती लाभली.
![]() |
| - Advertisement - |
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. पालकांनीही आपल्या भावना व्यक्त करत मराठा सेवा संघाचे आभार मानले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मराठा सेवा संघाचे सचिव एस. एम. पाटील यांनी केले.
– धुळे दर्पण –
(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)
(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)
तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम


