धुळे दर्पण न्यूज :- मोदी सरकारच्या कारभाराला यंदा ११ वर्षे पूर्ण होत असताना, या काळात देशात सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण याला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले, अशा शब्दांत केंद्रीय वस्त्रोद्योग राज्यमंत्री नामदार संजय सावकारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचे जोरदार कौतुक केले. धुळे शहरातील आमदार अनुप अग्रवाल यांच्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."

  या पत्रकार परिषदेला माजी केंद्रीय मंत्री डॉ. सुभाष भामरे, भाजप जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, ग्रामिण जिल्हाध्यक्ष बापु खलाणे, माजी महापौर चंद्रकांत सोनार, ओमप्रकाश अग्रवाल, सुभाष देवरे, प्रतिभा चौधरी, हिरामण गवळी आदी मान्यवर उपस्थित होते.

- Advertisement -

११ वर्षांचा 'सुवर्णकाळ'

  ना. सावकारे म्हणाले की, "२०१४ साली नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारल्यापासून देशाच्या राजकीय संस्कृतीत आमूलाग्र बदल झाला आहे. भ्रष्टाचार, तुष्टीकरण व घोटाळ्यांची जागा पारदर्शकता, जबाबदारी आणि विकासाने घेतली. ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास’ या मंत्रानुसार केंद्र सरकारने काम करत देशाचा कायापालट घडवून आणला."


गरीबांपासून महिलांपर्यंत सर्वांचा समावेश

  मोदी सरकारने गरीब, महिला, शेतकरी, युवा, दलित, आदिवासी व ओबीसी घटकांसाठी विविध योजनांद्वारे समाजाच्या तळागाळातील लोकांपर्यंत सरकारी मदत पोहचवली आहे. या योजनांमध्ये प्रधानमंत्री आवास योजना, उज्वला योजना, स्वच्छ भारत मिशन, पीएम गरीब कल्याण अन्न योजना, आयुष्मान भारत योजना यांचा प्रमुख समावेश आहे.

- Advertisement -

  ११ वर्षांत २५ कोटी नागरिकांना गरीबी रेषेच्या वर आणण्यात सरकारला यश आले, तर पीएम आवास योजनेंतर्गत ७० टक्क्यांहून अधिक घरे महिलांच्या नावे झाली. महिला सक्षमीकरणासाठी ‘नारी शक्ती वंदन अधिनियम’, ‘मातृ वंदना योजना’, आणि ३० कोटी मुद्रा कर्जे देण्यात आली, त्यापैकी बहुतांश लाभार्थी महिला उद्योजक होत्या.


शेती व शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास

  ना. सावकारे यांनी नमूद केले की, "११ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर ३.७ लाख कोटी रुपये थेट जमा करण्यात आले. पीक विमा योजनेसाठी १.७५ लाख कोटी, सिंचन योजनेसाठी ९३ हजार कोटी रुपये तर हमीभावात सातत्याने वाढ करण्यात आली. केंद्राने कांदा, बासमती तांदळावरील निर्यात मर्यादा हटवून शेतकऱ्यांना दिलासा दिला."


युवक व शिक्षण क्षेत्रात क्रांती

  उच्च शिक्षणात महिलांची नोंदणी २८% ने वाढली, तर STEM कोर्सेसमध्ये महिलांची नोंदणी ४३% असून ती जगातील सर्वोच्च आहे. सरकारने १७ कोटी नोकऱ्या निर्माण केल्या असून १.४२ कोटींना कौशल्य प्रशिक्षण देण्यात आले. वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या दुप्पट करण्यात आली असून, तरुणांसाठी शिक्षण क्षेत्र अधिक सुलभ व व्यावसायिक बनवण्यात आले आहे.


राष्ट्रीय सुरक्षा, जागतिक विश्वासार्हता आणि ऐतिहासिक निर्णय

  मोदी सरकारने घेतलेले काही ऐतिहासिक निर्णय म्हणजे कलम ३७० रद्द करणे, तीन तलाक बंदी कायदा, CAA कायदा, नवीन वक्फ कायदा सुधारणा, हे सर्व निर्णय देशाच्या हितासाठी महत्त्वपूर्ण ठरले. तसेच ‘गतीशक्ती, सागरमाला, भारतमाला, इंडस्ट्रियल कॉरिडोर’ योजनांमुळे देशात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक येत असून, भारत लवकरच जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल, असेही त्यांनी सांगितले.

Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:


धुळेतील पत्रकारांच्या प्रश्नांना ठाम उत्तर

  पत्रकारांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना ना. सावकारे यांनी स्पष्ट केले की, "गुलमोहर विश्रामगृहाच्या खोली क्रमांक १०२ मध्ये आढळलेल्या कोट्यवधी रुपयांच्या रोकड प्रकरणात विधीमंडळाच्या अंदाज समितीचा कोणताही सहभाग नव्हता, कारण त्या दिवशी ही समिती धुळ्यात नव्हतीच."

- Advertisement -

  "मोदी सरकारच्या या ११ वर्षांच्या कार्याचा आढावा घेतल्यास, हा काळ इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवण्यासारखा आहे. देशाच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकारने घेतलेले निर्णय आणि राबवलेल्या योजनांचे फलित आज सामान्य जनतेच्या जीवनमानात दिसून येत आहे," असे मंत्री संजय सावकारे यांनी सांगितले.

धुळे दर्पण
मुख्य संपादक : सैय्यद सानिल
📞 बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 8087860039 / 8806680480
📩 ईमेल : dhuledarpan@gmail.com

– धुळे दर्पण – 

(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)

(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम

- Advertisement -