धुळे दर्पण न्यूज :- शहरातील वाढत्या मोकाट कुत्र्यांच्या त्रासामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. गेल्या पाच वर्षांत भटक्या कुत्र्यांनी तब्बल १३,२४५ लोकांना चावा घेतला असून, या हल्ल्यांमध्ये चार जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर धुळे महापालिकेने मोकाट कुत्र्यांच्या निर्बीजीकरणासाठी प्रभावी पावले उचलली आहेत.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
महापालिकेने कोल्हापूर येथील एका खास संस्थेला ही जबाबदारी सोपवली असून, ४ जून ते ८ जून दरम्यान १७४ मोकाट कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यात आले. यामध्ये ९० नर आणि ८४ मादी कुत्र्यांचा समावेश आहे. ही सर्व शस्त्रक्रिया महापालिकेच्या वरखेडी कचरा डेपो येथील एबीसी कक्षात करण्यात आली असून, या कुत्र्यांना शस्त्रक्रियेनंतर तीन दिवस विश्रांतीसाठी ठेवण्यात आले. त्यांच्यावर आवश्यक उपचार केल्यानंतर त्यांना पुन्हा त्यांच्या मूळ परिसरात सोडण्यात आले आहे.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
महापालिकेने प्रभागनिहाय डॉग व्हॅन फिरवून कुत्र्यांचे पकडण्याचे नियोजन केले आहे. दर कुत्र्यावर सरासरी ₹१६५० इतका खर्च येतो. यामुळे निर्बीजीकरणावर होणारा खर्च महापालिकेने मोफत केला आहे, त्यामुळे शहरातील नागरिकांनी गैरसमज न करता महापालिकेच्या या उपक्रमाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.
![]() |
| - Advertisement - |
कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाचे फायदे
मोकाट कुत्र्यांची संख्या वाढल्यामुळे अनेकदा सार्वजनिक आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. यामुळे रस्त्यांवरील अपघात, लहान मुलांवरील हल्ले, कुत्र्यांमधील भांडणे आणि रेबीजसारख्या रोगांचा धोका वाढतो. मात्र, निर्बीजीकरणामुळे कुत्र्यांची संख्या नियंत्रित करता येते आणि अशा प्रकारच्या घटनांमध्ये लक्षणीय घट होते.
महापालिकेच्या या उपक्रमामुळे धुळेकरांना भविष्यात मोकाट कुत्र्यांच्या त्रासापासून मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.


