धुळे दर्पण न्यूज :- महाराष्ट्रातील अंध, अपंग, शेतकरी व वंचित घटकांचे एकमेव आशास्थान ठरलेले माजी आमदार आणि जनतेचे लढवय्ये नेते मा. श्री. बच्चू कडू सध्या गेल्या पाच दिवसांपासून बेमुदत उपोषणावर बसले आहेत. त्यांच्या या उपोषणाकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी माजी आमदार अनिल गोटे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या सविनय निवेदनाद्वारे केली आहे.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
गोटे यांनी आपल्या निवेदनात मुख्यमंत्री फडणवीस यांना उद्देशून लिहिले आहे की, "मा. श्री. बच्चू कडू हे केवळ एक माजी आमदार नाहीत, तर राज्यातील लाखो अपंग, अंध, शेतकरी, बेरोजगार, आणि वंचित घटकांचा आवाज आहेत. त्यांचं उपोषण हे कोणताही राजकीय हेतू न ठेवता जनतेच्या समस्यांसाठी आहे, त्यामुळे त्यांच्या उपोषणाकडे राजकीय चष्म्याने न पाहता, मानवतेच्या दृष्टीने पाहण्याची गरज आहे."
त्यांनी आपल्या निवेदनात स्पष्टपणे नमूद केले की, "मी कोणताही राजकीय लाभ घेण्यासाठी बोलत नाही. मला माझ्या मर्यादांची पूर्ण जाणीव आहे. पण ज्याप्रमाणे मा. अण्णा हजारे किंवा मा. मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषणांना तातडीने प्रतिसाद देत शासनाने सकारात्मक निर्णय घेतले, तशीच तत्परता बच्चू भाऊंसाठी दाखवावी हीच विनंती आहे."
![]() |
| - Advertisement - |
गोटे यांनी मुख्यमंत्री यांच्याकडून अपेक्षा व्यक्त केली आहे की, "उपोषण सोडविण्यासाठी तत्काळ सकारात्मक पावले उचलावी, त्यांच्या मागण्यांबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करावा आणि हा प्रश्न केवळ संवादातून आणि तत्काळ निर्णयातूनच मार्गी लावावा."
या पत्रामधून गोटे यांनी बच्चू कडू यांच्या लढ्याला नैतिक पाठबळ दिले आहे, तसेच राज्य सरकारला जबाबदारीची जाणीव करून दिली आहे. दरम्यान, बच्चू कडू यांच्या उपोषणामुळे राज्यातील विविध समाजघटकांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, सरकारने वेळीच पावले न उचलल्यास आंदोलनाला व्यापक स्वरूप येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
निष्कर्षतः, माजी आमदार गोटे यांची ही भावनिक आणि स्पष्ट भूमिका राज्यातील सामाजिक न्याय आणि लोकहितासाठी एक महत्त्वाचा इशारा मानली जात आहे. आता मुख्यमंत्री काय भूमिका घेतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.


