"गल्लीपासून दिल्लीपर्यंत 'ते' सत्तेत आहेत, पण इकडे सामान्य जनता मात्र खड्ड्यात आहे," अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली. या दुर्घटनेमुळे ना फक्त वाहतुकीस अडथळा निर्माण झाला, तर वाहनचालकाचे आर्थिक नुकसानही झाले. या घटनेने मनपाच्या पायाभूत सुविधांवरील अपयशावर पुन्हा प्रश्नचिन्ह उभे केले आहे.
भुयारी गटार योजना अपयशी; नागरिकांचे जीवन धोक्यात
धुळे शहरात गेल्या काही वर्षांत राबवण्यात आलेल्या भुयारी गटार योजनेमुळे रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. अनेक ठिकाणी चेंबर तुटलेले, दबलेले किंवा उंचावलेले असल्यामुळे वाहनचालकांना व पादचाऱ्यांना रोजच्या रोज अपघातांचा सामना करावा लागतो. मनपाच्या निकृष्ट कामामुळे शहरातील रस्ते हे खड्ड्यांचे जाळे बनले आहे.
![]() |
| - Advertisement - |
दुचाकीस्वार, वृद्ध नागरिक आणि लहान मुले या अयोग्य उंचीवरील चेंबरमुळे वारंवार जखमी होत आहेत. काही ठिकाणी मोठ्या अपघातांची शक्यताही निर्माण झाली आहे. मात्र, इतक्या गंभीर परिस्थितीतही महानगरपालिका प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
तेजस गोटेंनी घेतली तत्काळ दखल
या गंभीर घटनेची माहिती मिळताच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे युवा नेते तेजस आप्पा गोटे तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी रस्त्याची पाहणी करत प्रशासनाच्या निष्क्रीय धोरणावर तीव्र शब्दांत टीका केली.
"शहरात सतत अपघात होतात, नागरिकांचे जीवन धोक्यात आहे, पण तरीही प्रशासन डोळेझाक करत आहे. जर वेळेत दुरुस्ती न झाली, तर आम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल," असा इशाराही गोटे यांनी यावेळी दिला.
त्यांनी महापालिकेला तात्काळ पत्र देऊन गल्ली क्र. ४ चा रस्ता आणि इतर धोकादायक ठिकाणांची पाहणी करून काम हाती घेण्याची मागणी केली आहे.
नागरिकांमधून तीव्र संताप, दुरुस्तीची मागणी
या घटनेनंतर गल्ली क्रमांक ४ सह संपूर्ण शहरातून नागरिकांतून संतापाची लाट पसरली आहे. अनेकांनी सोशल मिडियावर प्रशासनाच्या विरोधात रोष व्यक्त करत रस्त्यांची दुर्दशा दाखवणारे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले.
नागरिकांची एकमुखी मागणी आहे की, महापालिकेने शहरातील सर्व धोकादायक खड्डे आणि चेंबर तातडीने दुरुस्त करावेत, अन्यथा महापालिकेवर विश्वास ठेवणे अशक्य आहे.
याप्रकरणी महानगरपालिकेने लवकरात लवकर कार्यवाही करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
![]() |
| - Advertisement - |
📌 मुख्य मुद्दे:
- श्रीराम मेडिकलसमोर चारचाकी वाहन खड्ड्यात अडकले
- गल्ली क्र. ४ ची दुरवस्था; नागरिकांमध्ये तीव्र संताप
- तेजस गोटे यांची महापालिकेला तातडीची मागणी
- भुयारी गटार योजनेतील काम निकृष्ट; चेंबरमुळे दररोज अपघात
- संपूर्ण शहरात खड्ड्यांचे साम्राज्य; नागरिक त्रस्त



