बनावट दस्ताऐवज तयार करून मनपाची जागा स्वतःची दाखवली, शिक्षण अनुदान लाटणाऱ्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
या प्रकरणात फिर्यादी अहमद अब्दुल रज्जाक (रा. कसाबवाडा, महापालिकेच्या दवाखान्याशेजारी, धुळे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, अतिक अख्तर महमद युसुफ (रा. बिडी कारखाना शेजारी, माधवपुरा), हबीबुर रहमान अब्दुल मजीद (रा. अकसा नगर, वडजाई रोड) आणि पटेल युनुस बशीर (रा. अजमेरा नगर, नॅशनल उर्दू हायस्कूल जवळ) या तिघांनी संगनमत करून शासकीय यंत्रणेला फसवले.
![]() | |
|
काय आहे प्रकरण?
सन २००८-२००९ या शैक्षणिक वर्षात या तिघांनी महापालिकेच्या मोकळ्या जागेचा बनावट दस्ताऐवज सादर करून ती जागा स्वतःच्या मालकीची असल्याचे दाखवले. बनावट प्रतिज्ञापत्र तयार करून त्या जागेवर शाळा सुरू असल्याचे दाखवले आणि शाळेसाठी पायाभूत सुविधा पुरविण्याच्या नावाखाली शासनाकडे अनुदानाची मागणी केली.
दरवर्षीप्रमाणे त्या वेळी शासकीय धोरणानुसार प्रत्येक शाळेस २ लाख रुपयांचे अनुदान दिले जात होते. याच नियमानुसार, त्यांनी तीन शाळांसाठी तब्बल ६ लाख रुपयांचे अनुदान मंजूर करून घेतले. मात्र, संबंधित शाळा महापालिकेच्या मालकीच्या जागेवरच सुरू होत्या आणि जागेचे खरे स्वामित्व त्यांच्याकडे नव्हते, हे तपासात पुढे आले.
न्यायालयाच्या आदेशावर कारवाई
या प्रकरणी पोलिसांनी अद्याप गुन्हा दाखल न केल्यामुळे तक्रारदारांनी थेट न्यायालयात धाव घेतली. सुनावणीदरम्यान सादर करण्यात आलेल्या पुराव्यांची दखल घेत न्यायालयाने भारतीय दंड संहितेच्या कलम १५७ (३) अंतर्गत तातडीने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार आझाद नगर पोलीस ठाण्यात संबंधित तिघांविरुद्ध फसवणूक, बनावट दस्ताऐवज तयार करणे आणि शासकीय यंत्रणेची दिशाभूल करणे यासारख्या गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
![]() | |
|
पुढील तपास सुरु
या प्रकरणात शासनाची फसवणूक होऊन शासकीय निधीचा गैरवापर झाल्याचा ठपका असल्याने, प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येत आहे. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, आरोपींनी कोणत्या पातळीवर संगनमत करून हे अनुदान मिळवले, याचा तपास केला जात आहे.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
धुळे महापालिकेच्या जागेवर अनधिकृतरित्या शाळा चालवून शासकीय निधी मिळविण्याचा हा प्रकार उघडकीस आल्यामुळे शालेय शिक्षण विभाग तसेच नगरविकास विभागातील अधिकार्यांची भूमिकाही तपासाच्या कक्षेत येण्याची शक्यता आहे.
.jpeg)


