धुळे दर्पण न्यूज :- आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकारच्या 'प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान' अंतर्गत धुळे जिल्ह्यातील उमरपाटा (ता. साक्री) व लौकी (ता. शिरपूर) येथील आश्रमशाळांमध्ये लाभवाटप शिबिरांचे आयोजन करण्यात आले. दोन्ही ठिकाणी ही शिबिरे मोठ्या उत्साहात पार पडली असून, आदिवासी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शासकीय योजनांचा लाभ घेतला.

Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:

उमरपाटा शिबिरामध्ये विविध योजनांचा लाभ वाटप

  साक्री तालुक्यातील उमरपाटा येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेत आयोजित शिबिरामध्ये जिल्हा प्रशासन व आदिवासी विकास विभागाच्या वतीने प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत घरकुल मंजुरी प्रमाणपत्रे, जातीचे दाखले, रहिवासी दाखले, रेशन कार्ड आदींचे वितरण करण्यात आले. यावेळी कृषी विभाग, महिला व बालविकास प्रकल्प, जलजीवन मिशन यासह विविध शासकीय योजनांची माहिती लाभार्थ्यांना देण्यात आली.

- Advertisement -

  या कार्यक्रमास अपर तहसीलदार दत्ता शेजुळ, गटविकास अधिकारी शशिकांत सोनवणे, सहायक प्रकल्प अधिकारी मनोज पाटील तसेच विविध विभागांचे अधिकारी, स्थानिक सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. जिल्हाधिकारी तथा जिल्हा नोडल अधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी सर्व पात्र लाभार्थ्यांनी अभियानात सहभागी होऊन शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी प्रमोद पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली.

लौकी येथील शिबिरालाही मोठा प्रतिसाद

  शिरपूर तालुक्यातील लौकी येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेत आयोजित शिबिरालाही आदिवासी बांधवांचा उत्तम प्रतिसाद लाभला. या शिबिराचे उद्घाटन तहसीलदार महेंद्र माळी यांच्या अध्यक्षतेखाली झाले. गटविकास अधिकारी प्रदीप पवार, तालुका कृषी अधिकारी संजय पवार, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, वनक्षेत्रपाल आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. आश्रमशाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचाही सक्रिय सहभाग होता.

- Advertisement -

  यावेळी अध्यक्षीय भाषणात तहसीलदार महेंद्र माळी यांनी प्रधानमंत्री धरती आबा अभियानामुळे आदिवासी समाजाच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व आरोग्यविषयक विकासाला चालना मिळेल, असे सांगितले. सहायक प्रकल्प अधिकारी मनिष पाटकरी यांनी शिबिराचे प्रास्ताविक करताना आदिवासी समाजासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची सविस्तर माहिती दिली. शिबिरात विविध योजनांच्या लाभांचे वितरण करण्यात आले.

"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."

शासनाच्या ‘एक हात मदतीचा’ उपक्रमाला ग्रामीण भागात प्रतिसाद

  या अभियानाच्या माध्यमातून केंद्र सरकार आदिवासी समाजाच्या जीवनशैलीत सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. ‘एक हात मदतीचा’ या भावनेने ग्रामीण व दुर्गम भागातील आदिवासींना शासकीय योजनांचा थेट लाभ मिळावा, यासाठी हे अभियान सुरू करण्यात आले असून, उमरपाटा व लौकी येथील शिबिरांनी त्याला बळ दिले आहे.


धुळे दर्पण
मुख्य संपादक : सैय्यद सानिल
📞 बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 8087860039 / 8806680480
📩 ईमेल : dhuledarpan@gmail.com

– धुळे दर्पण – 

(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)

(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम

- Advertisement -