धुळे जिल्हा रुग्णालयातील वरिष्ठ त्वचारोग तज्ज्ञ डॉ. अभिषेक पाटील सांगतात की, नागीण ही संसर्गजन्य असून त्वचेवर पाण्याने भरलेले लहान लहान फोड, जळजळ, खाज, असह्य वेदना आणि ताप ही याची प्रमुख लक्षणे आहेत. विशेषतः शरीराच्या एका बाजूवर हे फोड येतात. सुरुवातीला डोकेदुखी, थंडी भरून येणे, थकवा आणि पोटदुखी ही लक्षणे दिसू लागतात.
"बहुतेक वेळा रुग्ण सुरुवातीला याकडे दुर्लक्ष करतात किंवा घरगुती उपाय करतात. मात्र यामुळे आजार वाढू शकतो आणि उपचार कठीण होतो. त्यामुळे अशी कोणतीही लक्षणे दिसल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे," असे डॉ. पाटील स्पष्ट करतात.
![]() | |
|
🔍 नागीणची लक्षणे कोणती?
- ताप येणे
- डोकेदुखी
- थंडी भरून येणे
- अंगावर विशिष्ट भागात, विशेषतः एका बाजूला, पाण्याने भरलेले फोड
- फोड येण्याआधी किंवा नंतर खाज, जळजळ, मुंग्या येणे
- वेदना होणे
🩺 उपचार काय असतो?
नागीणवर वेळीच उपचार घेतल्यास तो नियंत्रित करता येतो. डॉक्टरांच्या सल्ल्याने खालील औषधे दिली जातात:
- अँटीव्हायरल औषधे – अॅसायक्लोविर, फॅमसीक्लोविर, व्हॅलासायक्लोविर
- अधिक वेदना असल्यास ओस्टावॅक्स व्हॅक्सिन दिले जाते
- वेदनाशामक औषधे आणि त्वचेवर लावण्याचे मलमही दिले जाऊ शकते
उपचाराचा कालावधी २ ते ३ आठवड्यांचा असतो.
🍲 कसा आहार घ्याल?
रुग्णांनी उपचाराबरोबरच आहारात बदल करणेही आवश्यक आहे.
- व्हिटॅमिन A, B, C, E युक्त आहार
- हिरव्या पालेभाज्या, मोसंबी, संत्री, पपई, बीट, गाजर
- भरपूर पाणी प्या
- तिखट, तेलकट आणि मसालेदार पदार्थ टाळा
- सिगारेट, तंबाखू, अल्कोहोल यापासून दूर रहा
![]() |
| - Advertisement - |
🛑 घरगुती उपाय करू नका!
नागीण हा संसर्गजन्य आजार असल्याने तो इतरांना होण्याची शक्यता असते. घरगुती उपाय न करता डॉक्टरांकडे जाणे हाच सुरक्षित मार्ग आहे. उशीर केल्यास फोड अधिक मोठे होतील, वेदना वाढतील आणि नंतरही त्या दीर्घकाळ राहू शकतात (Post Herpetic Neuralgia).
📢 डॉ. अभिषेक पाटील यांचे आवाहन
"नागीणची लक्षणे दिसल्यावर तातडीने त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घ्या. घरगुती उपाय टाळा. वेळेत उपचार घेतल्यास त्रास कमी होतो आणि बरे होण्याचा कालावधी लहान होतो."
नागीणसारखा आजार छोटा समजून दुर्लक्ष करू नका! त्वचेशी संबंधित कोणतेही विचित्र लक्षण दिसल्यास त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला त्वरित घ्या. वेळेवर उपचार म्हणजे त्रास टळतो!
– धुळे दर्पण –
(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)
(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)
तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम
![]() |
| - Advertisement - |



