गेल्या काही दिवसांपासून साक्री तालुक्यातील अनेक गावांमध्ये अवेळी वीजपुरवठा खंडित होणे, शहरी आणि ग्रामीण भागात लोंबकळणाऱ्या तारांमुळे होणारे अपघात, तसेच शेतकरी बांधवांना सिंचनासाठी निर्माण होणाऱ्या अडचणी या प्रमुख समस्या ठरल्या होत्या. या पार्श्वभूमीवर शिवसेना संपर्क कार्यालयात तक्रारींचा ओघ वाढला होता.
![]() | |
|
साक्री येथील विश्रामगृहात झालेल्या या बैठकीत शिवसेना सहसंपर्कप्रमुख विशाल देसले, पिंपळनेर विभागाचे उपकार्यकारी अभियंता विकास नवसारी, कनिष्ठ अभियंता हर्षल कमळकर, कासारे विभागाचे अभियंता अभिरूप कुंभार, साक्री विभागाचे उपकार्यकारी अभियंता गणेश जाधव, सहाय्यक अभियंता हेमंत अहिरे आदी अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत ग्रामस्थांच्या प्रमुख मागण्यांवर सविस्तर चर्चा झाली.
शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे:
- कृषी पंपाची वीज अचानक खंडित होणे थांबवावे व नियमित वीजपुरवठा करावा.
- सिंगल फेजची सकाळी १ तास वाढ आणि संध्याकाळी १ तास घट करून एकूण २ तास वाढीव वीज द्यावी.
- मोठा तांत्रिक बिघाड झाल्याशिवाय अचानक वीज बंद करू नये.
- जळालेले ट्रान्सफॉर्मर केवळ २ दिवसात उपलब्ध करून द्यावेत.
- सर्व अभियंता, कनिष्ठ अभियंता, वायरमन यांना ग्रामस्थांशी सुसंवाद साधण्याच्या सूचना द्याव्यात.
- उघड्या रोहित्र पेट्या बंद कराव्यात, अपघात टाळण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी.
- लोंबकळणाऱ्या तारा हटवून केबल टाकावी.
- दुरुस्तीच्या कामाची पूर्वसूचना सोशल मीडियाच्या माध्यमातून द्यावी.
- जीर्ण झालेल्या तारांची तातडीने बदली करावी.
या सर्व मागण्यांवर महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, पुढील ५ दिवसांत सर्व मागण्या पूर्ण केल्या जातील असे लेखी आश्वासनही बैठकीत देण्यात आले.
![]() |
| - Advertisement - |
या पार्श्वभूमीवर विशाल देसले यांनी जाहीर केले की, "महावितरण विभागाने शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत लेखी आश्वासन दिले असल्यामुळे शिंगाडा मोर्चा तूर्तास स्थगित करण्यात येत आहे. मात्र जर आश्वासनांची अंमलबजावणी न झाल्यास, अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल."
या बैठकीला शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख सुभाष देसले, उपतालुकाप्रमुख निलेश कुवर, कासारे पोलीस पाटील दीपक काकुस्ते, नितीन खैरनार, राकेश देसले, शुभम खैरनार, अमोल अहिरे, दीपक खैरनार, अविनाश खैरनार, यश देसले आदी पदाधिकारी व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
शेतकऱ्यांच्या हितासाठी शिवसेना नेहमीच तत्पर आहे आणि अन्यायकारक प्रशासनाच्या विरोधात आवाज उठवत राहील, असे विशाल देसले यांनी शेवटी स्पष्ट केले.
_______________________________________________



