| टिपू सुलतान स्मारक |
धुळे दर्पण न्यूज :- धुळे शहराचे माजी आमदार फारुख शहा यांना औरंगाबाद खंडपीठाकडून मोठा धक्का बसला आहे. जुन २०२३ मध्ये त्यांच्यावर दाखल झालेल्या राजद्रोहासह अन्य गंभीर गुन्ह्यांची तक्रार रद्द करण्यासाठी त्यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळला असून, कायद्याचा गैरवापर करून समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांना संरक्षण दिले जाऊ शकत नाही, अशी स्पष्ट टिप्पणी न्यायालयाने दिली आहे.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
काय आहे प्रकरण?
जून २०२३ मध्ये चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात माजी आमदार फारुख शहा यांच्याविरुद्ध राजद्रोह (कलम 124A), धार्मिक भावना भडकावणे (कलम 153A), फसवणूक (कलम 420), धमकी देणे (कलम 506), अपप्रेरणा (कलम 504), कट रचणे (कलम 120B), आणि सार्वजनिक मालमत्तेची हानी प्रतिबंधक कायदा (MPDPA) कलम 3 व 4 अशा गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
![]() |
| - Advertisement - |
या प्रकरणात आरोप आहे की, माजी आमदार फारुख शहा यांनी चाळीसगाव रोड परिसरातील एका चौकात "हिंदू विरोधी" ठरवण्यात आलेल्या टीपू सुलतानाचे स्मारक बेकायदेशीरपणे उभारले, आणि त्यामुळे धार्मिक तेढ निर्माण होण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष अॅड. रोहित चांदोडे यांच्या तक्रारीवरून ही कारवाई झाली होती.
अर्जाचा निकाल आणि न्यायालयातील युक्तीवाद
माजी आमदार शहा यांनी ही फिर्याद रद्द करण्यासाठी औरंगाबाद खंडपीठात अर्ज दाखल केला होता. या अर्जावर न्यायमूर्ती विभा कंकणवाडी व न्यायमूर्ती संजय देशमुख यांच्या खंडपीठाने सुनावणी घेतली.
![]() |
| - Advertisement - |
शहांच्या वतीने सादर करण्यात आलेल्या युक्तीवादात सांगण्यात आले की, "टीपू सुलतान हे स्वातंत्र्यसैनिक होते आणि त्यांच्या नावाने स्मारक उभारणे गुन्हा ठरू शकत नाही. शिवाय आमदार निधीतून काम करतांना शासनाची परवानगी घेण्यात आली होती." अशी बाजू शहांच्या वकिलांनी मांडली.
दुसरीकडे, तक्रारदार अॅड. रोहित चांदोडे यांच्यावतीने ॲड. चेतन चौधरी यांनी अत्यंत प्रभावी व विश्लेषणात्मक युक्तीवाद सादर करत मुद्देसूद उत्तर दिले. चौधरी यांनी न्यायालयात ठाम भूमिका घेत स्पष्ट केले की, “कोणत्याही सार्वजनिक जागेला कोणतेही नाव देण्यासाठी स्थानिक स्वराज संस्थेची मान्यता आवश्यक असते. एका आमदाराने एकतर्फी निर्णय घेऊन धार्मिकदृष्ट्या संवेदनशील व्यक्तीचे स्मारक उभारणे हे समाजात तेढ निर्माण करणारे असून, कायद्याच्या विरुद्ध आहे.”
![]() |
| - Advertisement - |
न्यायालयाचा ठाम निष्कर्ष
न्यायालयाने या दोन्ही बाजूंच्या युक्तिवादाची चिकित्सा करून स्पष्ट निष्कर्ष दिला की, शहा यांचा उद्देश फक्त स्मारक बांधणे नव्हता, तर एक विशिष्ट विचारसरणीचा प्रचार करत समाजात धार्मिक द्वेषाची पेरणी करणे हा त्यामागचा हेतू असल्याचे प्राथमिक पुराव्यांवरून स्पष्ट होते.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
तसेच, चौकशी अद्याप अपूर्ण असताना तपासात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे निरीक्षणही न्यायालयाने नोंदवले. परिणामी, न्यायालयाने शहा यांचा गुन्हा रद्द करण्याचा अर्ज फेटाळत त्यांना कायद्याच्या चौकटीतच न्याय मिळेल, असा स्पष्ट संदेश दिला.



