धुळे दर्पण न्यूज :- धुळे तालुक्यातील मोघण येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष पुरस्कृत जनसेवा पॅनलने प्रचंड यश संपादन केले आहे. या निवडणुकीत एकूण १३ जागांसाठी मतदान घेण्यात आले होते. त्यापैकी तब्बल ११ जागांवर जनसेवा पॅनलचे उमेदवार विजयी ठरले असून त्यांनी स्पष्ट बहुमताने एकहाती सत्ता काबीज केली आहे.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
हा विजय जनतेच्या अपार विश्वासाचा आणि कार्यकर्त्यांच्या सातत्यपूर्ण मेहनतीचा परिपाक असल्याचे स्थानिक नेत्यांनी सांगितले. पॅनलच्या प्रचारात व यशात भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठे योगदान दिले असून मतदारांनीही या पॅनलला भरघोस प्रतिसाद दिला.
![]() | |
|
या विजयाबद्दल आमदार राम भदाणे पाटील (धुळे ग्रामीण विधानसभा) यांनी विजयी सर्व सदस्यांचा सत्कार करून त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन केले. “हा विजय म्हणजे गावाच्या सर्वांगीण विकासावर जनतेचा ठाम विश्वास असून सहकार क्षेत्रात नवी दिशा देण्याची संधी आहे,” असे त्यांनी सांगितले.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
नवीन निवडून आलेल्या सदस्यांकडून शेतकरी, महिला, युवक व ग्रामीण भागाच्या विकासाला चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. या दणदणीत विजयामुळे मोघण परिसरात उत्साहाचे व आनंदाचे वातावरण पसरले आहे.
____________________________________________


