धुळे दर्पण न्यूज :- धुळे येथील रहिवासी श्री. राहुल गोपीनाथ भोई यांना हिप जॉइंट ऑपरेशनसाठी आर्थिक मदतीची नितांत गरज होती. उपचारासाठी आवश्यक असलेली रक्कम मोठी असल्याने त्यांना ती व्यवस्था करणे कठीण बनले होते. मात्र, योग्य मार्गदर्शन आणि तत्पर प्रयत्नांमुळे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीच्या माध्यमातून त्यांना मदतीचा हात मिळाला आहे.

  राहुल भोई यांच्यासाठी ए. बी. फाउंडेशन, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष, तसेच जिल्हाधिकारी कार्यालय, धुळे यांच्या समन्वयातून सर्व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून ऑनलाइन अर्ज मुख्यमंत्री कार्यालयात पाठवण्यात आला होता. या अर्जावर सकारात्मक निर्णय घेत मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून १ लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली आहे.

- Advertisement -

  या निधीचे मंजुरी पत्र आज धुळे जिल्ह्याचे आमदार मा. अनुप अग्रवाल यांच्या हस्ते रुग्णाचे नातेवाईक यांना आमदार कार्यालयात प्रदान करण्यात आले. यावेळी आमदार अनुप अग्रवाल यांनी रुग्णाच्या प्रकृतीसाठी सदिच्छा व्यक्त करत या प्रकारच्या मदतीसाठी लोकांनी वेळेत व नियमबद्धपणे अर्ज करावा, असे आवाहन केले.

"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."

  राहुल भोई व भोई कुटुंबीयांनी या संपूर्ण प्रक्रियेमध्ये मदत करणाऱ्या सर्वांचा मनःपूर्वक आभार मानला. त्यांनी मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रमुख श्री. रामेश्वर नाईक, डॉ. स्वानंद सोनार, डॉ. रितेश पाटील, डॉ. मनोज विसपुते, तसेच या कामात सक्रिय योगदान देणारे डॉ. योगेश पाटील, श्री. प्रमोद बागुल, श्री. कपिल पिवाल आणि ए. बी. फाउंडेशनचे श्री. कमलेश देवरे यांचे विशेषतः आभार मानले.

___________________________________________________

धुळे दर्पण
मुख्य संपादक : सैय्यद सानिल
📞 बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 8087860039 / 8806680480
📩 ईमेल : dhuledarpan@gmail.com

– धुळे दर्पण – 

(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)

(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम

- Advertisement -