धुळे दर्पण न्यूज :- घरेलू कामगारांसाठी संरक्षण आणि हक्क सुनिश्चित करणारा सर्वंकष केंद्रीय कायदा करावा, अशी ठाम मागणी नवनिर्मिती घरेलू कामगार संघटनेतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून करण्यात आली आहे. शहरातील साक्री रोड परिसरातील ४०० हून अधिक घरेलू महिला कामगारांनी आपले हस्ताक्षर असलेले पत्र पाठवत या मागणीला अधिक बळ दिले आहे.

Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:

सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला घरेलू कामगारांसाठी स्वतंत्र कायदा करण्याचे स्पष्ट आदेश दिले असून, अजूनही केंद्र सरकारकडून ठोस पाऊल उचलण्यात आलेले नाही. त्यामुळे देशभरातील लाखो घरेलू कामगारांचे भविष्य अंधारात असून त्यांना शोषण, अपमान आणि असुरक्षिततेला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर नवनिर्मिती संघटनेने हा पुढाकार घेतला आहे.

या मोहिमेअंतर्गत शहाजी शिंदे, योगिता खेडवण, सविता खेडवनकर, ऊर्मिला गवळी, संगीता मोरे, शोभा लोंढे, शीतल नागमल, शीतल कुलकर्णी आदी कार्यकर्त्यांच्या नेतृत्वाखाली कामगार महिलांनी एकत्र येत पंतप्रधानांना पत्र पाठवले. या पत्रात त्यांनी खालील मुख्य मागण्या नमूद केल्या आहेत:

- Advertisement -
  1. घरेलू कामगारांसाठी स्वतंत्र, सर्वसमावेशक आणि केंद्रीय कायदा तातडीने लागू करावा.
  2. कामगार म्हणून ओळख, नोंदणी व ओळखपत्र देण्यात यावे.
  3. किमान वेतन, सुट्ट्या, आजारी रजा व इतर कामगार हक्क निश्चित करावेत.
  4. कामाच्या ठिकाणी सुरक्षितता आणि लैंगिक शोषणापासून संरक्षण यासाठी यंत्रणा उभारण्यात यावी.
  5. घरेलू कामगारांसाठी कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी आणि विमा संरक्षण मिळावे.
  6. "बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."

घरेलू कामगारांना अद्याप औपचारिक कामगार म्हणून मान्यता मिळालेली नाही, त्यामुळे त्यांच्या सामाजिक व आर्थिक सुरक्षेचा प्रश्‍न कायम आहे. 'स्वच्छ भारत', 'बेटी बचाओ', 'जन धन योजना', 'उज्ज्वला योजना' यांसारख्या विविध जनकल्याणकारी योजनांमधून सरकारने महिलांसाठी पावले उचलली आहेत, मात्र घरकाम करणाऱ्या महिलांचा विचार होणे ही काळाची गरज आहे, असे संघटनेचे म्हणणे आहे.

या आंदोलनाच्या निमित्ताने संघटनेने संपूर्ण महाराष्ट्रभर जनजागृती मोहीम राबवण्याचा निर्धार केला असून, जर केंद्र सरकारने लवकरात लवकर कायदा केला नाही, तर देशव्यापी आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

घरेलू कामगार महिलांचा आवाज आता थांबवता येणार नाही. आम्ही आमचे हक्क मागण्यासाठी एकवटत आहोत. सरकारने आता कानाडोळा केल्यास शांत बसणार नाही, असा ठाम इशारा या महिलांनी दिला.


धुळे दर्पण
मुख्य संपादक : सैय्यद सानिल
📞 बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 8087860039 / 8806680480
📩 ईमेल : dhuledarpan@gmail.com

– धुळे दर्पण – 

(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)

(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम

- Advertisement -