धुळे दर्पण न्यूज :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या अकरा वर्षांच्या कार्यकाळात राबविण्यात आलेल्या विविध जनकल्याणकारी योजनांमुळे देशातील सामान्य जनतेच्या जीवनमानात लक्षणीय वाढ झाली आहे. गरिब, महिलावर्ग, शेतकरी, कामगार या घटकांना दिलासा देणाऱ्या योजनांमुळे 'सबका साथ, सबका विकास' हे ध्येय प्रत्यक्षात उतरल्याचे प्रतिपादन आमदार अनुप अग्रवाल यांनी केले.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
भाजपच्या शहर आमदार जनसंपर्क कार्यालयात अलीकडेच आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेत ते बोलत होते. या कार्यशाळेचे आयोजन केंद्रातील मोदी सरकारच्या अकरा वर्षांच्या कार्यकाळानिमित्त करण्यात आले होते.
या वेळी माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष रामकृष्ण खलाणे, शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, रवी बेलपाठक, जितेंद्र चवटिया, भीमसिंग राजपूत, विजय पाच्छापूरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
![]() |
| - Advertisement - |
कार्यशाळेत बोलताना आमदार अनुप अग्रवाल म्हणाले की, “मोदी सरकारच्या काळात देशातील महिलांना ‘लाडकी बहीण’ योजनेमुळे मोठा आर्थिक आधार मिळाला आहे. महिलांसाठी मोफत शिक्षणाची सुविधा, कमी दरात प्रवास, घरगुती गॅस योजनांद्वारे दिलासा मिळालेला आहे.
शेतकऱ्यांसाठी ‘पीएम किसान’ योजनेअंतर्गत दरवर्षी १२ हजार रुपये थेट खात्यावर जमा होत आहेत. आरोग्यासाठी ‘आयुष्मान भारत’ योजनेद्वारे गरीब कुटुंबांना ५ लाखांपर्यंत मोफत उपचार सुविधा मिळते आहे. ‘जनधन योजना’द्वारे कोट्यवधी नागरिकांना बँकिंग सेवांचा लाभ मिळाला आहे.”
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
त्यांनी पुढे सांगितले की, “या योजना घरोघरी पोहोचवण्यासाठी आणि सामान्य जनतेपर्यंत त्यांचे फायदे पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी झटून काम करावे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपला विजय मिळवून द्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.”
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पृथ्वीराज पाटील यांनी केले. यशवंत येवलेकर, संदीप बैसाणे, चेतन मंडोरे, माजी महापौर जयश्री अहिरराव, चंद्रकांत सोनार, प्रतिभा चौधरी, आकाश परदेशी, वैशाली शिरसाट, पवन जाजू, संतोष मोगलाईकर, प्रकाश उबाळे, सागर कोडगीर, बाळासाहेब भदाणे, भाऊसाहेब देसले, नारायण पाटील, अशोक सुडके, दगडू बागूल, वंदना थोरात, आरती पवार, पंकज धात्रक, हर्षकुमार रेलन, नीलेश राजपूत यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
![]() |
| - Advertisement - |
या कार्यशाळेद्वारे भाजप कार्यकर्त्यांना केंद्र सरकारच्या योजनांची माहिती देऊन जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचण्याचे आवाहन करण्यात आले.



