धुळे दर्पण न्यूज :- राज्य शासनाच्या गृह विभागाने शुक्रवारी राज्यभरातील पोलीस दलातील मोठ्या प्रमाणावर अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश निर्गमित केले आहेत. या आदेशानुसार एकूण ५६ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून, यामध्ये धुळे जिल्ह्यातील अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांची बदलीही समाविष्ट आहे. काळे यांची नाशिक येथे पोलीस उपायुक्त पदावर बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी लातूर येथील अपर पोलिस अधीक्षक अजय लक्ष्मण देवरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:

  किशोर काळे हे धुळे जिल्ह्यात अत्यंत शिस्तप्रिय व कार्यतत्पर अधिकारी म्हणून ओळखले जात होते. गुन्हेगारी नियंत्रण, पोलीस विभागातील शिस्तबद्ध कारभार आणि जनतेसोबतचे सुसंवाद यासाठी त्यांची कारकीर्द विशेष गाजली होती. त्यांची नाशिकसारख्या मोठ्या शहरात पोलीस उपायुक्त पदावर बदली ही त्यांच्या कार्यक्षमतेवर सरकारने दाखवलेला विश्वास मानला जात आहे.

- Advertisement -

  त्यांच्या जागी येणारे अजय देवरे हेही पोलिस खात्यात अनुभवी अधिकारी आहेत. लातूर जिल्ह्यात अपर पोलिस अधीक्षक म्हणून काम करत असताना त्यांनी अनेक गुन्हेगारी कारवायांवर नियंत्रण मिळवले होते. आता ते धुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पार पाडणार आहेत.

  दरम्यान, राज्यस्तरावरील या बदल्यांमध्ये पोलीस प्रशिक्षण केंद्र, नाशिक येथील प्राचार्य आणि वरिष्ठ अधिकारी विजय पवार यांची बृहन्मुंबई पोलीस उपायुक्त पदावर बदली झाली आहे. त्यांच्या जागी नाशिक मुख्यालयात उपायुक्त पदावर कार्यरत असलेले चंद्रकांत खांडवी हे नव्याने प्राचार्य म्हणून कार्यभार स्वीकारणार आहेत.

"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."

  या बदल्यांमुळे राज्यातील पोलिस यंत्रणेमध्ये नवचैतन्य निर्माण होईल, तसेच विविध जिल्ह्यांतील कायदा व सुव्यवस्थेच्या कामकाजाला नव्या नेतृत्वाचा लाभ होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.


धुळे दर्पण
मुख्य संपादक : सैय्यद सानिल
(B.Com, M.Com, M.A.MCJ)
📞 बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 8087860039 / 8806680480
📩 ईमेल : dhuledarpan@gmail.com

– धुळे दर्पण – 

(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)

(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम

- Advertisement -