धुळे दर्पण न्यूज :- धुळे तालुक्यातील नेर गावाने आपल्या संस्कृतीचा, कृतज्ञतेचा आणि अभिमानाचा अत्युच्च आविष्कार करत गावातील दोन थोर सुपुत्रांचा भव्य नागरी सत्कार आयोजित केला. गावात जन्म घेऊन आपल्या कार्यक्षेत्रात अतुलनीय कामगिरी केलेल्या या दोन विभूतींमुळे संपूर्ण गावाचा नावलौकिक उंचावला आहे.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
या सत्कार समारंभात श्री. डॉ. आर. टी. बोरसे (सेवानिवृत्त अधिष्ठाता, ससून रुग्णालय, पुणे) आणि मा. कुलगुरू डॉ. योगेंद्र नेरकर (महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी) यांचा ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करण्यात आला. या दोन्ही मान्यवरांनी आपल्या सेवाभावातून व कार्यकुशलतेतून समाजाला दिशा दिली असून, त्यांनी गाठलेले शिखर नव्या पिढीसाठी दीपस्तंभ ठरणारे आहे.
![]() | |
|
कार्यक्रमात उपस्थित राहून सत्कार करण्याचा मान धुळे ग्रामीणचे आमदार राम भदाणे पाटील यांना मिळाला. त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून याबद्दलचा गौरव व्यक्त केला. “नेर गावाचा आज मला अपार अभिमान वाटतोय. आपल्या गावातील सुपुत्रांचा गौरव करताना गावाने दाखवलेली एकजूट, आपुलकी आणि आदरभाव मनाला स्पर्शून गेला. ही संस्कृती जपणं हीच खरी सेवा आहे,” असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमास मोठ्या संख्येने गावकरी, विद्यार्थी, विविध संस्था, राजकीय, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. सत्कार समारंभानंतर दोन्ही सन्मानित व्यक्तींनी आपले अनुभव, संघर्ष आणि यशोगाथा उलगडत नव्या पिढीला प्रेरणा दिली.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
नेर गावाने दाखवलेला हा सन्मानाचा सोहळा फक्त दोन व्यक्तींचा गौरव न राहता, तो गावाच्या आदर्श विचारांचा, मूल्यांचा आणि उन्नत दृष्टीकोनाचा प्रतीक ठरला आहे.
________________________________________________


