धुळे दर्पण न्यूज :- नाशिक परिक्षेत्रातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश नुकतेच निर्गमित झाले असून, धुळे जिल्ह्यातील अनेक वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. या बदल्यांमुळे जिल्ह्यातील पोलिस यंत्रणेत हालचाली वाढल्या असून नवीन अधिकारी आपल्या कामकाजाची सूत्रे लवकरच स्वीकारणार आहेत.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
या आदेशानुसार, धुळे तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अभिषेक दिलीप पाटील यांची नंदुरबार येथे बदली करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे साक्री पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक जयेश धुडकू खलाणे यांची देखील नंदुरबार येथे बदली झाली आहे.
![]() |
| - Advertisement - |
याशिवाय इतर तीन पोलिस उपनिरीक्षकांचीही बदली करण्यात आली असून त्यामध्ये विजय देवराम पाटील यांची जळगाव, निकिती निवृत्ती महाले यांची नाशिक ग्रामीण आणि अनिल सुभाष महाजन यांची देखील जळगाव येथे बदली झाली आहे.
या बदल्यांमागे विहित कालावधी पूर्ण न केलेल्या पोलिस अधिकाऱ्यांची विनंती असल्याची माहिती आहे. अशा अधिकाऱ्यांनी स्वेच्छेने बदल्यांसाठी अर्ज केले होते. यावर कारवाई करत नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक दतात्रय कराळे यांनी या बदल्यांचे आदेश काढले आहेत.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
या आदेशानुसार, बदल्यांचे आदेश मिळालेल्या सर्व अधिकाऱ्यांना तत्काळ कार्यमुक्त करण्यात यावे, असे निर्देश जिल्ह्यातील पोलीस अधीक्षकांना देण्यात आले आहेत. तसेच, जे अधिकारी आपल्या नवीन नियुक्त स्थळी वेळेत हजर होणार नाहीत, त्यांच्या विरोधात शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी आणि त्याचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाला सादर करावा, असेही आयजींनी स्पष्टपणे आदेशात नमूद केले आहे.
या बदल्यांमुळे धुळे जिल्ह्यातील पोलिस प्रशासनात नवीन ऊर्जा व कार्यपद्धती येईल, अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त होत आहे. नव्याने येणाऱ्या अधिकाऱ्यांसमोर कायदा-सुव्यवस्था टिकवणे, गुन्हेगारीवर अंकुश ठेवणे आणि जनतेचा विश्वास वाढवणे ही मुख्य आव्हाने असतील.

