धुळे दर्पण न्यूज :- धुळे महापालिकेच्या हद्दवाढीतील क्षेत्राचा प्रारूप विकास आराखडा (ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लॅन) तयार करण्यात आला असून, त्यासंबंधित नागरिकांच्या सूचना व हरकती मागविण्यात येत आहेत. नगर रचना अधिनियमाअंतर्गत या प्रारूप आराखड्यावर हरकती नोंदविण्यासाठी ३० दिवसांची मुदत देण्यात आली आहे. या कालावधीत नागरिकांनी आपल्या हरकती लेखी स्वरुपात कारणांसह महापालिका आयुक्तांकडे सादर कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
महापालिकेने स्पष्ट केले आहे की, नागरिकांकडून आलेल्या सर्व सूचनांचा व हरकतींचा सविस्तर विचार करूनच अंतिम विकास आराखडा तयार केला जाणार आहे. मात्र अनेक नागरिकांनी अद्यापही कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे महापालिकेने १५ जून २०२५ ही अंतिम मुदत निश्चित केली असून, त्यानंतर प्राप्त होणाऱ्या हरकती विचारात घेतल्या जाणार नाहीत, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
![]() |
| - Advertisement - |
महापालिकेच्या हद्दवाढीमुळे अनेक नवीन क्षेत्रांचा विकास आराखड्यात समावेश करण्यात आला आहे. परिणामी संबंधित भूखंडधारक, व्यावसायिक, रहिवासी यांना याचा थेट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी सजग रहावे, व आपल्या मालमत्तेच्या किंवा परिसरातील आराखड्याशी संबंधित हरकती अथवा सूचना लेखी स्वरुपात सादर कराव्यात, असे महापालिकेचे आवाहन आहे.
सदर प्रारूप आराखड्याची प्रत महापालिकेच्या नगररचना विभागात तसेच महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इच्छुक नागरिकांनी हा आराखडा तपासून आपली हरकत १५ जूनपूर्वी सादर करावी, जेणेकरून आपल्या हक्काचे संरक्षण होऊ शकेल.
हरकती कशा सादर कराव्यात?
- हरकती लेखी स्वरूपात असाव्यात.
- संबंधित जागेची तपशीलवार माहिती (सर्व्हे क्रमांक, क्षेत्र, वापर इ.) नमूद करावी.
- हरकतीची कारणे स्पष्ट असावीत.
- पत्र महापालिका आयुक्त, धुळे महानगरपालिका, यांचेकडे सादर करावे.
- Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
धुळे दर्पण


