धुळे दर्पण न्यूज :- धुळे शहरातील स्टेट बँक शाखेत घडलेल्या प्रकरणावरून शिवसेनेने धुळे पोलीसांवर एकतर्फी कारवाईचा गंभीर आरोप करत नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षकांकडे लेखी तक्रार दिली आहे. या तक्रारीमध्ये शिवसेनेच्या जिल्हा व महानगर पदाधिकाऱ्यांनी पीआय धनंजय पाटील यांच्यावर "राजकीय आणि आर्थिक दबावाखाली वागत" पक्षपाती कारवाई केल्याचा ठपका ठेवला आहे.

Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:

  दि. ४ जून २०२५ रोजी सायंकाळी ७ ते ८ वाजेच्या सुमारास जयहिंद कॉलनी, देवपूर येथील रहिवासी आणि शिक्षिका सौ. पद्मा किसन शिंदे या गोल्ड लोन संबंधित व्यवहारासाठी स्टेट बँक शाखेत गेल्या होत्या. त्या वेळी बँकेचे मॅनेजर अतुल गांधी आणि सदाशिव अजगे यांनी त्यांच्याशी "मराठी भाषिक असल्याच्या" कारणावरून अपमानास्पद, अश्लील आणि प्रांतिक तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्याचा आरोप श्रीमती शिंदे यांनी केला आहे. एवढेच नव्हे तर त्यांच्या अंगविक्षेप आणि अश्लील हावभाव करत विनयभंग केल्याचेही आरोपपत्रात नमूद आहे.

- Advertisement -

  श्रीमती शिंदे यांनी लगेच देवपूर पोलीस ठाणे गाठले असता, घटनास्थळी गंभीर स्वरूपाचा गुन्हा असूनही पोलिसांनी केवळ साधी ‘एनसी’ नोंदवल्याचे सांगण्यात आले. या अन्यायाविरुद्ध शिवसेनेने दि. ९ जून रोजी बँक शाखेसमोर आंदोलन केले. त्यानंतर शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन योग्य ती प्रक्रिया पूर्ण केली असताना, पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांनी उलटपक्षी शिवसेना जिल्हा उपप्रमुख नरेंद्र परदेशी आणि महानगर प्रमुख धिरज पाटील यांना अटक केली. परंतु, या संपूर्ण प्रकरणात आरोपी असलेल्या सदाशिव अजगे यांना मात्र पोलिसांनी अभय दिल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला आहे.

"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."

  शिवसेनेचे आरोप आहेत की, आरोपी अजगे हा पोलीस स्टेशनमध्ये दोन दिवस खुलेआम वावरत होता, सीसीटीव्ही फुटेजमध्येही त्याचा वावर स्पष्टपणे दिसून येतो. तरीही पोलीस निरीक्षक पाटील यांनी त्याच्या विरोधात कोणतीही अटकेची कारवाई केली नाही. त्याऐवजी तो "माझ्यासाठी दोन दोन मंत्र्यांचे फोन येतील" असे धमकीवजा वक्तव्य करीत होता. यावरून त्याच्या मागे असलेला राजकीय पाठबळ आणि पोलिसांवरील दबाव उघड झाल्याचा दावा तक्रारकर्त्यांनी केला आहे.

- Advertisement -

  या प्रकरणावरून शिवसेनेचे उपनेते सौ. शुभांगीताई पाटील, जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, उपजिल्हाप्रमुख नरेंद्र परदेशी, महानगर प्रमुख धिरज पाटील यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे सविस्तर तक्रार सादर करत पीआय धनंजय पाटील यांच्यावर शिस्तभंगाची तसेच विभागीय चौकशीची मागणी केली आहे.

  या प्रकरणामुळे शहरात पोलिसांच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, महिला सुरक्षिततेच्या मुद्द्यावरूनही गंभीर चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, संबंधित पोलिसांकडून किंवा स्टेट बँकेकडून या प्रकरणावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही.

धुळे दर्पण
मुख्य संपादक : सैय्यद सानिल
📞 बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 8087860039 / 8806680480

📩 ईमेल : dhuledarpan@gmail.com

– धुळे दर्पण – 

(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)

(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम

- Advertisement -