धुळे दर्पण न्यूज :- धुळे महापालिकेने शहरात प्लास्टिक बंदीचे काटेकोर पालन व्हावे यासाठी कारवाईची मोहिम अधिक तीव्र केली असून, ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत पेठ भागात प्लास्टिक पिशव्या विक्रेत्यांवर धाडसत्र राबवण्यात आले. या कारवाईदरम्यान तीन विक्रेत्यांकडून प्रत्येकी ५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून, एक टन प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या आहेत.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
महापालिकेच्या या कारवाईने शहरातील प्लास्टिक विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. ही कारवाई प्रभारी आयुक्त करुणा डहाळे आणि उपायुक्त हेमंत निकम यांच्या आदेशानुसार, मुख्य स्वच्छता निरीक्षक राजेश वसावे, लक्ष्मण पाटील, विकास साळवे, प्लास्टिक बंदी प्रमुख रुपेश पवार, तसेच अख्तर शेख यांच्या विशेष पथकाद्वारे करण्यात आली.
![]() | |
|
महापालिकेने यापूर्वीच संपूर्ण शहरात एकल वापराच्या प्लास्टिकवर बंदी लागू केली असूनही अनेक व्यापारी आणि फेरीवाले नियमांकडे दुर्लक्ष करत आहेत. विशेषतः पाच कंदिल, साक्री रोड, देवपूर दत्त मंदिर, नकाणे रोड, वाडीभोकर रोड, आग्रा रोड परिसरात प्लास्टिक पिशव्यांचा वापर सर्रासपणे होत असल्याचे महापालिकेच्या निरीक्षणात आले आहे.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
पर्यावरण रक्षणाची दिशा
महापालिकेच्या मते, प्लास्टिकच्या पिशव्यांमुळे नद्या, नाले व पाणी प्रवाहात अडथळे, जमिनीची सुपीकता घटणे तसेच प्राणी व पक्ष्यांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. त्यामुळे नागरिकांनी पर्यावरणपूरक पर्यायांचा अवलंब करावा, जसे की कापडी, कागदी किंवा पुनर्वापर करता येणाऱ्या पिशव्या वापरणे आवश्यक आहे.
![]() | |
|
महापालिकेचे आवाहन आहे की, "शहर स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने जबाबदारीने वागावे. प्लास्टिकचा वापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल."
कारवाई सुरूच राहणार
महापालिकेचे अधिकारी सांगतात की, ही कारवाई एकदाच मर्यादित न राहता सातत्याने करण्यात येणार आहे. शहरातील सर्व व्यापाऱ्यांना, दुकानदारांना आणि फेरीवाल्यांना याची पूर्वसूचना देण्यात आलेली आहे की, प्लास्टिक पिशव्यांचा साठा आढळल्यास दंड आणि जप्तीची कारवाई होईल.
नागरिकांचे योगदान आवश्यक
या मोहिमेला यशस्वी बनवण्यासाठी नागरिकांनीही पुढाकार घेणे गरजेचे आहे. स्वच्छता हीच सेवा आणि पर्यावरण रक्षण या उद्देशाने चालविल्या जाणाऱ्या मोहिमेत प्रत्येकाने सहभाग द्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
मुख्य संपादक : सैय्यद सानिल | धुळे दर्पण
– धुळे दर्पण –
(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)
(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)
तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम
.jpeg)

