धुळे दर्पण न्यूज :- राज्याचे माजी मुख्यमंत्री व हरित क्रांतीचे शिल्पकार कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त धुळे येथे १ जुलै २०२५ रोजी "कृषि दिन" मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. यानिमित्ताने धुळे तालुक्यातील पारोळा रोडवरील कृषि महाविद्यालयाच्या सभागृहात सकाळी ९.३० वाजता भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाची माहिती जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी श्री. सिताराम चौधरी यांनी दिली.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
कार्यक्रमात जिल्ह्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या प्रगतशील, प्रयोगशील व आदर्श शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. विशेषतः फळबाग, सेंद्रिय शेती, प्रक्रिया उद्योग, महिला शेतकरी आणि युवा शेतकरी गटातील उत्कृष्ट योगदान देणाऱ्यांना गौरवण्यात येईल.
![]() |
| - Advertisement - |
या निमित्ताने शेतकऱ्यांसाठी विविध शासकीय योजनांची माहिती, प्रक्रिया उद्योग उभारणीसाठी मार्गदर्शन, शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना, तसेच आधुनिक शेतीविषयक ज्ञान व कौशल्ये याविषयी सविस्तर मार्गदर्शन सत्राचे आयोजनही करण्यात आले आहे. शेतकरी गट, महिला बचत गट, युवा उद्योजक आणि कृषि क्षेत्राशी संबंधित संस्था यांना या कार्यक्रमातून निश्चितच दिशा मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
कार्यक्रमात कृषि विभागाचे अधिकारी, मान्यवर पाहुणे, कृषी तज्ज्ञ, उद्योजक व शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होणार असून, हा कार्यक्रम शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
शेतकऱ्यांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषि विभागातर्फे करण्यात आले आहे.
.jpeg)

