मोहाडी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद; दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ

  धुळे दर्पण न्यूज :- शहराजवळील तिखी तलावात मासे पकडण्यासाठी गेलेल्या ५१ वर्षीय पुरुषाचा पाय घसरून पाण्यात पडल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी (२८ जुलै) दुपारी घडली. जावेद अब्दुल लतीफ अन्सारी (वय ५१, रा. हजार खोली, धुळे) असे या मृत व्यक्तीचे नाव आहे. मोहाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री ९ वाजून ५३ मिनिटांच्या सुमारास या घटनेची नोंद करण्यात आली.

  मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी जावेद अन्सारी हे तिखी तलावात मासे पकडण्यासाठी गेले होते. मात्र, मासे पकडताना पाय घसरल्याने ते पाण्यात पडले. पाण्यात पडल्यावर त्यांच्या नाकात व तोंडात पाणी गेल्याने ते बेशुद्ध झाले. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थ आणि नातेवाईकांनी तातडीने मदतीला धाव घेतली. त्यांनी अन्सारी यांना पाण्यातून बाहेर काढून खाजगी वाहनाने चक्करबडी येथील हिरे रुग्णालयात दाखल केले.

- Advertisement -

  रुग्णालयात डॉक्टर विजय गायकवाड यांनी त्यांची तपासणी करून सोमवारी दुपारी ३ वाजून ३० मिनिटांच्या सुमारास मृत घोषित केले. यानंतर नातेवाईकांनी मोहाडी पोलिस ठाण्यात घटनेची माहिती दिली. पोलिसांनी प्रथमदर्शनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.

  या दुर्घटनेमुळे अन्सारी कुटुंबियांसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मासे पकडण्याच्या छंदातूनच हा अपघात घडला असून, एक कुटुंब आपल्या कर्त्या व्यक्तीला गमावून बसले आहे. मोहाडी पोलिस अधिक तपास करत आहेत.

"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."

धुळे दर्पण
मुख्य संपादक : सैय्यद सानिल
(B.Com, M.Com, M.A.MCJ)
📞 बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 8087860039 / 8806680480
📩 ईमेल : dhuledarpan@gmail.com

– धुळे दर्पण – 

(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)

(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम

- Advertisement -