अंजुमन खैरुल इस्लामचे पूना कॉलेज घेऊन आलं क्रांतिकारी 'वन-क्लिक प्रश्नपत्रिका' उपक्रम
डॉ. प्रभाकर देसाई (प्रभारी संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) यांच्या हस्ते उद्घाटन

पुणे, ३० जून २०२५ :

  धुळे दर्पण न्यूज :- पुण्यातील प्रतिष्ठित अंजुमन खैरुल इस्लामचे पूना कॉलेजतर्फे विद्यार्थ्यांसाठी एक क्रांतिकारी आणि पर्यावरणपूरक उपक्रम सुरू करण्यात आला आहे — ‘वन-क्लिक प्रश्नपत्रिका’. या अभिनव डिजिटल उपक्रमाचे उद्घाटन डॉ. प्रभाकर देसाई, प्रभारी संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या हस्ते पार पडले.

👉Click here 👈सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 'वन-क्लिक प्रश्नपत्रिका' एप्रिल २०२५👈

  या उपक्रमांतर्गत ए.के.आय.च्या पूना कॉलेजने एप्रिल २०२५ च्या परीक्षा प्रश्नपत्रिका डिजिटल स्वरूपात रूपांतरित केल्या असून त्या एकाच क्लिकवर विद्यार्थ्यांना सहज उपलब्ध होतील. हे तंत्रज्ञान सुमारे ३ लाख विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर ठरणार असून, पुणे विद्यापीठाशी संलग्न ५०० हून अधिक कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयांना याचा लाभ होणार आहे.

पर्यावरणासाठी एक मोठं पाऊल

  या प्रकल्पामुळे लाखो छापील पानांची बचत होणार असून, पर्यावरणाचे संरक्षण ही देखील या उपक्रमाची एक महत्त्वाची बाजू आहे. आतापर्यंत कॉलेजने  ४  मागिल परीक्षांचे जुने प्रश्नपत्रिका संच डिजिटल केल्यामुळे सुमारे १२ लाख विद्यार्थ्यांना मदत झाली असून, १.२ कोटी पानांचा कागद वाचवला गेला आहे.

Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:

कार्यक्रमात उपस्थित आणि महत्त्वाचे योगदान

  या कार्यक्रमात डॉ. इक्बाल शेख (प्राचार्य, पूना कॉलेज), डॉ. सय्यद वकील (परीक्षा अधिकारी व संशोधन मार्गदर्शक), श्री. अकबर पठाण आणि श्री. अजीम तांबोळी (परीक्षा विभाग), उपस्थित होते. पूना कॉलेजच्या परीक्षा विभाग आणि IQAC यांच्यावतीने हा उपक्रम प्राचार्य डॉ. इक्बाल शेख यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आला.

सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या उपयुक्त

  डॉ. प्रभाकर देसाई यांनी पूना कॉलेजच्या या उपक्रमाचे तोंडभरून कौतुक करताना सांगितले की, "ही एक सामाजिकदृष्ट्या उपयुक्त, विद्यार्थ्यांना सोयीची आणि पर्यावरणपूरक अशी दिशा आहे. डिजिटल शिक्षण आणि शाश्वत शैक्षणिक व्यवस्था निर्माण करण्याच्या दृष्टीने हे एक मोठे पाऊल आहे."

"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."

  ‘वन-क्लिक प्रश्नपत्रिका’ हा उपक्रम उच्च शिक्षणात डिजिटल परिवर्तन घडवून आणण्यासोबतच परीक्षेच्या प्रक्रियेला वेगवान, सुरक्षित आणि पारदर्शक बनवण्याचा धाडसी प्रयत्न आहे. पूना कॉलेजने केलेले हे पाऊल इतर महाविद्यालयांसाठी आदर्श ठरावे, अशी अपेक्षा आहे.

___________________________________________________________________________________
धुळे दर्पण
मुख्य संपादक : सैय्यद सानिल
(B.Com, M.Com, M.A.MCJ)
📞 बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 8087860039 / 8806680480
📩 ईमेल : dhuledarpan@gmail.com

– धुळे दर्पण – 

(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)

(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम

- Advertisement -