धुळे दर्पण न्यूज :- धुळे प्रादेशिक परिवहन कार्यालयातील तत्कालीन प्रादेशिक परिवहन अधिकारी परवेज खुदायारखाँ तडवी, मोटार वाहन निरीक्षक सुनील प्रकाश ठाकूर, लिपिक, वाहन चालक व देवपूर पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलिस निरीक्षक संजय सानप यांच्यावर अखेर भारतीय दंड संहिता कलम ३४७, ३५५, ३८९, ४०९, १०९, २०९, २११ आणि ३४ अंतर्गत गुन्हे दाखल करण्याचे आदेश मुख्य न्यायदंडाधिकारी, धुळे यांनी दिले आहेत.

Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:

  या संदर्भात आज सोमवार, दिनांक १४ जुलै रोजी दुपारी बारा वाजता पत्रकार भवन, साक्री रोड, धुळे येथे आयोजित पत्रकार परिषदेत अ‍ॅड. जहिरोद्दीन जयनोद्दीन शेख यांनी सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले की, तत्कालीन आर.टी.ओ. परवेज तडवी यांनी आपल्या कार्यकाळात भ्रष्टाचाराचे प्रकार केले – जसे की वाहन निरीक्षकांच्या ड्युट्या लावून देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैशांची मागणी, वाहन चालकांना धमकावून वसुली, तसेच ठेकेदारांकडून टक्केवारीची मागणी.

- Advertisement -

  अ‍ॅड. शेख यांनी या भ्रष्टाचाराविरोधात तक्रार केली असता, त्यांच्या विरोधातच कट रचून खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आणि माध्यमांतून त्यांची बदनामी करण्यात आली. या अन्यायाविरोधात त्यांनी ‘रुल ऑफ लॉ’, ‘ड्यू प्रोसेस ऑफ लॉ’ आणि ‘इक्वालिटी बिफोर लॉ’ या घटनात्मक तत्त्वांवर विश्वास ठेवून फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १५६(३) अन्वये मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयात दाद मागितली.

धुळे जिल्ह्याच्या महत्वपूर्ण अपडेट्स जाणून घेण्यासाठी आत्ताच जॉईन करा

न्यायालयीन तपशील:
मुख्य न्यायदंडाधिकारी के. बी. चौगुले यांनी दाखल तक्रारीतील पुरावे, साक्षीदारांचे जबाब, तसेच आरोपी क्रमांक १ परवेज तडवी यांच्या विरोधातील लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यातील प्रलंबित प्रकरणे विचारात घेतली. यावरून आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३४७, ३५५, ३८९, ४०९, १०९, २०९, २११ व ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले.
- Advertisement -

अ‍ॅड. शेख यांची प्रतिक्रिया:
“माझा आपल्या न्यायव्यवस्थेवर, कायद्याच्या प्रामाणिक प्रक्रियेवर पूर्ण विश्वास आहे. मी संघर्ष केला, सत्य मांडले, आणि अखेर न्यायालयाने दखल घेतली. भविष्यातही अन्याय व भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवत राहीन,” असे अ‍ॅड. जहिरोद्दीन शेख यांनी सांगितले.

धुळे दर्पण
मुख्य संपादक : सैय्यद सानिल
(B.Com, M.Com, M.A.MCJ)
📞 बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 8087860039 / 8806680480
📩 ईमेल : dhuledarpan@gmail.com

– धुळे दर्पण – 

(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)

(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम