धुळे दर्पण न्यूज :- साक्री तालुक्यातील न्यायालयीन सोयीसुविधा वाढवण्यासाठी साक्री येथे वरिष्ठ दिवाणी न्यायालय मंजूर करावे, अशी ठाम मागणी येथील वकील बांधवांनी पालकमंत्री जयकुमार रावल यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. या वेळी जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते, आमदार राम भदाणे आदी मान्यवर देखील उपस्थित होते.

Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:

  साक्री तालुका हा भौगोलिक दृष्ट्या महाराष्ट्रातील सर्वात मोठा तालुका असून, सध्या येथे केवळ दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तराचेच न्यायालय कार्यरत आहे. वरिष्ठ दिवाणी न्यायालय धुळे येथे असल्याने साक्री व परिसरातील पक्षकारांना न्यायालयीन कामासाठी मोठ्या अंतरावर जावे लागते. त्यामुळे अनेकांना वेळ, पैसा व मनस्ताप सहन करावा लागतो.

  वकील बांधवांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, साक्री न्यायालयापासून पश्चिमेकडे चरणमाळ गावापर्यंत सुमारे ६० किमी अंतर आहे. सध्या साक्री न्यायालयाचे कार्यक्षेत्र हे केवळ पाच लाखांपर्यंतच्या प्रकरणांपुरते मर्यादित आहे. पाच लाखांपेक्षा जास्त रकमेची प्रकरणे थेट धुळे जिल्हा न्यायालयात दाखल करावी लागतात. आजच्या घडीला स्थावर मालमत्तांच्या किंमतीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याने जास्तीत जास्त प्रकरणे ही पाच लाखांपेक्षा जास्त किमतीच्या असतात. त्यामुळे साक्री येथे वरिष्ठ दिवाणी न्यायालय स्थापन झाल्यास स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळेल, असेही निवेदनात स्पष्ट केले आहे.

- Advertisement -

  निवेदनानुसार, साक्री तालुक्यातील कार्यक्षेत्रातील २०२४ पर्यंतची एकूण १०१७ प्रलंबित प्रकरणे आहेत. त्यामध्ये सेशन केस, स्पेशल केस, फौजदारी अपील, जामीन अर्ज, फौजदारी रिव्हिजन अर्ज, फौजदारी किरकोळ अर्ज यांचा समावेश आहे. तसेच जिल्हा न्यायालय धुळे येथे ३७७ प्रलंबित दिवाणी प्रकरणे आहेत, ज्यामध्ये नियमित दिवाणी अपील, किरकोळ दिवाणी अपील, लवाद, मोटर अपघात प्रकरणे इत्यादींचा समावेश होतो.

  या निवेदनप्रसंगी अॅड. पूनम काकुस्ते, अॅड. दिनेश कोळी, अॅड. राहुलकुमार जाधव, अॅड. बादल साळुंके, अॅड. कैलास घरटे यांच्यासह २० हून अधिक वकील बांधव उपस्थित होते. पालकमंत्री जयकुमार रावल यांनी साक्री तालुक्याच्या गरजा लक्षात घेता लवकरच योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.

"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."

  या मागणीमुळे साक्री तालुक्यातील हजारो पक्षकार व नागरिकांना न्याय मिळवण्यासाठीचा प्रवास सुकर होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

धुळे दर्पण
मुख्य संपादक : सैय्यद सानिल
(B.Com, M.Com, M.A.MCJ)
📞 बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 8087860039 / 8806680480
📩 ईमेल : dhuledarpan@gmail.com

– धुळे दर्पण – 

(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)

(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम

- Advertisement -