धुळे दर्पण न्यूज :- धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी पोलिसांनी कारवाई करत निर्दयीपणे कोंबून वाहतूक केल्या जाणाऱ्या ३३ म्हशींची सुटका केली आहे. या कारवायांमध्ये एकूण दोन ट्रक, तसेच मोकळ्या केलेल्या जनावरांसह तब्बल १२ लाख ३९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:

  ही घटना १ जुलैच्या मध्यरात्रीपासून २ जुलैच्या पहाटेपर्यंत घडली. पहिला प्रकार महिर फाटा येथे घडला. पवन रमेश बोरसे (रा. अंबापूर रोड, साक्री) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून साक्री पोलिसांनी जीजे ०८ एडब्ल्यू ८६९२ क्रमांकाचा ट्रक थांबवून तपासणी केली. तपासात ट्रकमध्ये क्रूरपणे दोरीने बांधलेल्या आणि एकमेकांवर कोंबून ठेवलेल्या १७ म्हशी आढळून आल्या. या म्हशींना तत्काळ मुक्त करण्यात आले. याप्रकरणी चालक आसिफ इब्राहिम बलोच (वय ३६) आणि क्लीनर हसन सलिम नागोरी (वय २०, रा. छिदपुर पाटण, गुजरात) यांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी ५ लाखांचा ट्रक व १ लाख २६ हजार रुपयांच्या म्हशी, असा एकूण ६ लाख २६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

- Advertisement -

  दुसऱ्या घटनेत, दहिवेल गावाजवळ पहाटे पाचच्या सुमारास, जीजे ०९ एव्ही ६८८४ क्रमांकाचा ट्रक अडवून पोलिसांनी कारवाई केली. या ट्रकमध्ये देखील कोंबून ठेवलेल्या १६ म्हशींची सुटका करण्यात आली. याप्रकरणी चालक गणपत प्रताप ठाकरे (वय ३६) व त्याच्यासोबत असलेला आसिफ समिम खाटीक (वय २५, रा. सागबारा, जि. नर्मदा, गुजरात) यांना अटक करण्यात आली. या ट्रकमधून ५ लाखांचा ट्रक व १ लाख १३ हजार रुपयांच्या म्हशी, असा एकूण ६ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यासंदर्भात कुणाल शिंदे (रा. ककाणी, ता. साक्री) यांनी साक्री पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.

  या दोन्ही प्रकरणी संबंधित आरोपींविरुद्ध प्राण्यांसोबत क्रूरता, वाहतूक कायदे तसेच महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पी. डी. रौंदळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."

  पोलिसांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे निर्दयीपणे कोंबल्या गेलेल्या ३३ म्हशींना वेळेत जीवदान मिळाले असून अवैध प्राण्यांची वाहतूक करणाऱ्या टोळ्यांना धडा मिळाला आहे.

_______________________________________________________________

धुळे दर्पण
मुख्य संपादक : सैय्यद सानिल
(B.Com, M.Com, M.A.MCJ)
📞 बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 8087860039 / 8806680480
📩 ईमेल : dhuledarpan@gmail.com

– धुळे दर्पण – 

(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)

(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम

- Advertisement -