धुळे दर्पण न्यूज :- राज्यातील सुमारे १९ लाख सरकारी, निमसरकारी कर्मचारी व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांच्या हितासाठी कार्यरत असलेल्या सरकारी निमसरकारी कर्मचारी व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समितीचे नेते व राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे सरचिटणीस श्री विश्वास काटकर हे दिनांक २१ व २२ जुलै रोजी धुळे दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या या दौऱ्याची तयारी सध्या अंतिम टप्प्यात असून, जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयांत व संस्थांत संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सदस्यांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
दौऱ्याच्या पहिल्या दिवशी, २१ जुलै सोमवार रोजी दुपारी ३:३० वाजता औद्योगिक प्रशिक्षण संस्था, धुळे येथे संघटनेच्या फलकाचे अनावरण करण्यात येईल. त्यानंतर सायंकाळी ६:०० वाजता कल्याण भवन, धुळे येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना धुळे जिल्ह्याच्या आमसभेला ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून संबोधित करणार आहेत.
![]() |
| - Advertisement - |
दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी, २२ जुलै मंगळवार रोजी सकाळी ११ वाजता श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धुळे, दुपारी १२:०० वाजता बांधकाम भवन, धुळे, दुपारी १:०० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, धुळे आणि दुपारी ३:०० वाजता सिंचन भवन, धुळे येथे आयोजित केलेल्या द्वारसभांना ते मार्गदर्शन करणार आहेत.
या दौऱ्यात श्री काटकर यांच्यासमवेत संपर्क प्रमुख श्री श्रीराम देव आणि प्रसिद्धी प्रमुख श्री सुरेन्द्र सरतापे देखील उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमांना जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमसरकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्री राजेंद्र माळी, श्री दीपक पाटील, श्री अविनाश मोरे, श्री सुरेश पाईकराव, श्री सुधीर पोतदार आणि श्री सुरेश बहाळकर यांनी केले आहे.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
या दौऱ्याच्या निमित्ताने जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्या, समस्या आणि संघटनेच्या आगामी आंदोलनाच्या रणनीतीवर सविस्तर चर्चा होणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना आपल्या प्रश्नांना संघटनेच्या नेतृत्वाकडून थेट उत्तर मिळवण्याची आणि संवाद साधण्याची संधी मिळणार आहे.


