धुळे दर्पण न्यूज :- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, धुळे व मॉडेल करिअर सेंटर तसेच शिक्षण महर्षी दादासाहेब रावल नॉलेज सिटी, दोंडाईचा यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आज भव्य आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तसेच शिंदखेडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार जयकुमार रावल यांनी या कार्यक्रमाची माहिती स्वतःच्या फेसबुक पोस्टद्वारे दिली.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
या रोजगार मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक, अप्पर तहसीलदार संभाजी पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी, तसेच जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त राजू वाकोडे आदी मान्यवर उपस्थित होते.
![]() |
| - Advertisement - |
राज्य सरकारकडून सध्या मोठ्या प्रमाणात उद्योग क्षेत्रात गुंतवणूक केली जात आहे. ‘मेक इन इंडिया’ आणि ‘मेक इन महाराष्ट्र’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत इलेक्ट्रॉनिक्स, सेमीकंडक्टर, इलेक्ट्रिक वाहने, लॉजिस्टिक्स, वेअरहाउसिंग आणि सप्लाय चेन व्यवस्थापन अशा क्षेत्रांमध्ये हजारो नव्या रोजगार संधी निर्माण होत आहेत. कृषी आधारित उद्योगातही फार्मगेट प्रोसेसिंग, शीतगृह, फळ-भाजीपाला प्रक्रिया, कृषी ड्रोन, सेंद्रिय शेती आणि स्मार्ट सिंचन या उपक्रमांमुळे मोठ्या प्रमाणात रोजगाराची गरज भासत आहे.
तसेच राष्ट्रीय महामार्ग, रेल्वे, मेट्रो प्रकल्प आणि स्मार्ट सिटी मिशनमुळे कुशल आणि अकुशल कामगारांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगार संधी उपलब्ध होत आहेत. माहिती तंत्रज्ञान व डिजिटल क्षेत्रात ए.आय., डेटा सायन्स, ब्लॉकचेन, सायबर सिक्युरिटी, गेम डेव्हलपमेंट आणि डिझाईन अशा क्षेत्रांमध्ये उच्च शिक्षित युवकांसाठी करिअरच्या अमर्याद संधी खुल्या आहेत.
![]() |
| - Advertisement - |
कार्यक्रमात वर्क फ्रॉम होम आणि फ्रीलान्सिंगमुळे ग्रामीण भागात रोजगाराचा विस्तार होत असल्याचेही अधोरेखित करण्यात आले. तसेच सौर ऊर्जा, पवन ऊर्जा प्रकल्प, ईव्ही चार्जिंग स्टेशन आणि ग्रीन बिल्डिंग्समध्ये 2029 पर्यंत तब्बल 10 लाखांहून अधिक रोजगार निर्माण होण्याची शक्यता आहे, असेही सांगण्यात आले.
हेल्थटेक, टेलिमेडिसिन, आयुष सेवा, ग्रामीण आरोग्य केंद्रे आणि कौशल्य विकास प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रशिक्षित मनुष्यबळाची मोठी गरज आहे. इको-टुरिझम, गड-किल्ले पर्यटन तसेच आदिवासी भागातील पर्यटनामुळे स्थानिकांना गाईड, होमस्टे व्यवस्थापक, खाद्य सेवा अशा क्षेत्रांत रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. विशेष म्हणजे तरुणांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करून इतरांनाही रोजगार उपलब्ध करून देण्याची क्षमता स्वतःमध्ये निर्माण करावी, असेही आवाहन या मेळाव्यात करण्यात आले.
डिजिटल मार्केटिंग, युट्यूब, ब्लॉग यांसारख्या माध्यमातून डिजिटल स्वयंरोजगाराचे नवीन पर्याय तयार होत असून ग्रामीण भागातील युवक देखील योग्य तयारी करून यात यशस्वी होऊ शकतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मिळेल त्या संधीचा लाभ घ्यावा, सातत्याने प्रयत्न करावेत आणि स्वतःच्या भविष्याला उज्ज्वल बनवावे, असे आवाहन या रोजगार मेळाव्यात मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल मंत्री जयकुमार रावल यांनी समाधान व्यक्त करून सर्व सहभागी युवकांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
धुळे दर्पण
मुख्य संपादक : सैय्यद सानिल
(B.Com, M.Com, M.A.MCJ)
📞 बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 8087860039 / 8806680480
📩 ईमेल : dhuledarpan@gmail.com
– धुळे दर्पण –
(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)
(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)
तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम
![]() |
| - Advertisement - |


