धुळे दर्पण न्यूज :- श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना शाखा धुळे यांच्या संपादरम्यान आज आमदार अनुपभैय्या अग्रवाल यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. त्यांनी परिचारिकांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्याशी थेट फोनवरून चर्चा केली.

Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:

  विशेष म्हणजे, संप सुरू असतानाही परिचारिका संघटनेने सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान शिबिर आयोजित केले. या उपक्रमामुळे रुग्णसेवेला आधार मिळाला आणि रुग्णालयातील गरजू रुग्णांसाठी रक्तसाठा उपलब्ध झाला.

- Advertisement -


  आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आमदार अग्रवाल यांनी कर्मचाऱ्यांच्या योग्य मागण्या शासन दरबारी मांडून सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. संप लवकर मिटून रुग्णसेवा पूर्ववत व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."

धुळे दर्पण

मुख्य संपादक : सैय्यद सानिल

(B.Com, M.Com, M.A.MCJ)

📞 बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 8087860039 / 8806680480

📩 ईमेल : dhuledarpan@gmail.com

– धुळे दर्पण – 

(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)

(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम

- Advertisement -