धुळे दर्पण न्यूज :- धुळे लोकसभा मतदारसंघाच्या खासदार शोभाताई बच्छाव यांनी काल कोलकत्ता पावर कंपनी (MPCL) संदर्भातील वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत मालेगाव परिसरातील पावरलूम उद्योजकांना भेडसावणाऱ्या समस्या व त्यांच्या उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी पुढील महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करण्यात आले:

Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:

🔹 पूर्ण वोल्टेजने विद्युत पुरवठ्याचा अभाव
मालेगावमधील पावरलूम उद्योगांना पूर्ण क्षमतेने वोल्टेज मिळत नसल्यामुळे यंत्रांना जास्त वीज लागते व त्यामुळे वीज बिल अनावश्यकरीत्या वाढते.
- Advertisement -

🔹 वारंवार होणाऱ्या वीज खंडिततेची समस्या
वीज पुरवठा सतत खंडित होत असल्याने मशीन वारंवार थांबतात, त्यात चालू असलेल्या प्रक्रियेतील कापड अडकते व खराब होते. त्यामुळे उद्योजकांचे आर्थिक नुकसान वाढते, मजुरीचा खर्च वाढतो व उद्योगधंद्याचे वेळापत्रक बिघडते.

🔹 देखभाल व दुरुस्तीत हलगर्जी
कंपनीने शासनाशी केलेल्या करारानुसार देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी पार पाडावी लागते. मात्र, ही कामे अपेक्षेप्रमाणे होत नसून उद्योजकांना आवश्यक सेवा-सुविधा मिळत नाहीत.

🔹 नवीन विद्युत जोडण्यांचा विलंब
नव्या उद्योजकांना अद्यापही विद्युत जोडण्या देण्यात आलेल्या नाहीत. यामुळे नवीन उद्योग उभे राहण्यास मोठा अडथळा निर्माण झाला आहे.
- Advertisement -

🔹 इन्फ्रास्ट्रक्चरसाठी निधी असूनही काम प्रलंबित
प्रत्येक वर्षी पायाभूत सुविधांच्या देखभाल व दुरुस्तीवर कंपनीकडून २० कोटी रुपये खर्च करण्याचे नियमानुसार असूनही अद्यापही जुने कंडक्टर, केबल्स यांची अद्ययावत कामे झालेले नाहीत.

🔹 तक्रारींच्या तातडीच्या निवारणाची मागणी
पावरलूम धारक व उद्योजकांनी वेळोवेळी केलेल्या तक्रारींचे तातडीने निराकरण व्हावे, अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली.
- Advertisement -

खासदार शोभाताई बच्छाव यांनी संबंधित अधिकाऱ्यांना या समस्या गांभीर्याने घेऊन त्वरीत पावले उचलण्याच्या सूचना दिल्या. तसेच उद्योजकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी पुढील पातळीवर शासनदरबारी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.

या बैठकीमुळे पावरलूम क्षेत्रातील उद्योजकांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

धुळे दर्पण
मुख्य संपादक : सैय्यद सानिल
(B.Com, M.Com, M.A.MCJ)
📞 बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 8087860039 / 8806680480
📩 ईमेल : dhuledarpan@gmail.com

– धुळे दर्पण – 

(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)

(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम

- Advertisement -