![]() |
| बोरीस येथे कल्पतरु महिला प्रभाग संघाची सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न |
![]() |
| - Advertisement - |
सभेच्या प्रारंभी तालुका अभियान व्यवस्थापक ईश्वर पाटील यांनी अभियानाच्या उद्दिष्टांविषयी तसेच महिला उपजिविकेविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी ज्ञानज्योती भदाणे यांनी प्रभाग संघाच्या कार्याची प्रशंसा केली. त्यांनी सांगितले की, “बचत गटाच्या माध्यमातून महिला केवळ बचत करणाऱ्या नाहीत, तर उत्पादनक्षम उद्योजिका आणि 'लखपती दीदी' बनत आहेत. हे ग्रामीण भागातील आर्थिक सक्षमीकरणाचे आशादायक चित्र आहे.”
धरती देवरे यांनी महिलांना स्वावलंबनासाठी उद्योगाची दिशा दाखवली. “महिला केवळ हातात आलेल्या निधीवर अवलंबून न राहता, स्वतःचा व्यवसाय उभा करावा, कौशल्ये विकसित करावीत आणि आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र व्हावे, यासाठी सातत्याने प्रयत्न गरजेचे आहेत,” असे त्या म्हणाल्या.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
या वेळी हेमंत गवते यांनी शाश्वत उपजिविका, प्रभाग संघ व ग्रामसंघांचे महत्त्व, अन्न प्रक्रिया उद्योग, उत्पादक गट, बचत व्यवस्थापन आदी विविध घटकांवर मुद्देसूद मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास सरपंच नारायणसिंग गिरासे, बँक मॅनेजर गौतम विद्यानी, प्रभाग समन्वयक गणेश पाटील (बोरकुंड), ज्योती पगार (नेर व लामकानी), योगिता पाटील (नगाव), विजया अहिरे (बोरविहीर), सरीता चौधरी (देऊर बु.), तसेच ग्रामसंघाचे व प्रभाग संघाचे पदाधिकारी, सर्व समूह संसाधन व्यक्ती, व बचत गटांतील महिला सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
![]() |
| - Advertisement - |
सभेचे सूत्रसंचालन ज्योती पगार यांनी केले तर यशोदीप महिला ग्रामसंघाच्या अध्यक्षा प्रतिमा धिवरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.



