धुळे दर्पण न्यूज :- “आजच्या स्पर्धात्मक युगात नवउद्योजकांनी उद्योगाच्या वाटचालीत छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी, शिस्त व धोरणे आत्मसात करणे अत्यावश्यक झाले आहे. शिवरायांची उद्योगनीती ही फक्त इतिहासापुरती मर्यादित नसून, ती आजच्या काळातही उद्योजकांना योग्य दिशा देणारी ठरते,” असे प्रतिपादन म्हाडाचे सभापती रंजन ठाकरे यांनी केले.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
नाशिक जिल्हा मराठा सेवा संघाच्या मराठा उद्योजक विकास व मार्गदर्शन संस्थेच्या वतीने राजर्षी शाहू महाराज पॉलिटेक्निक कॉलेज, गंगापूर रोड येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस मराठा समाजातील अनेक उद्योजक, तरुण उद्योजक आणि व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
![]() |
| - Advertisement - |
कार्यक्रमाची सुरुवात सन्मानाने
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन, राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूजनाने झाली. जिजाऊ वंदनेने वातावरणात उत्साह संचारला.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य इंजी. प्रशांत पाटील होते. प्रमुख उपस्थितींमध्ये प्राचार्य ज्ञानोबा ढगे, ज्ञानवर्षा फाउंडेशनच्या वर्षा ढगे, जिल्हाध्यक्ष उल्हास बोरसे, माजी जिल्हाध्यक्ष उमेश शिंदे, डॉ. संदीप बोरसे, माधव मुधाळे, रामनाथ जगताप यांच्यासह अनेक मान्यवरांचा समावेश होता.
कौशल्यविकासावर विशेष भर
या बैठकीत जिल्हाध्यक्ष उल्हास बोरसे यांनी संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती देताना मराठा समाजातील युवकांनी फक्त पारंपरिक व्यवसायापुरतेच न थांबता, नवे तंत्रज्ञान आत्मसात करून स्टार्ट-अप, निर्यात व्यवसाय, कृषी प्रक्रिया उद्योग यामध्येही पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले.
रंजन ठाकरे यांनी आपल्या भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील उत्पादनाधिष्ठित प्रणाली, व्यापार मार्गांचे नियोजन, आर्थिक स्वावलंबनाचे धोरण यांचा उल्लेख करून नवउद्योजकांना प्रेरित केले. “फक्त मोठा व्यवसाय उभारणेच नव्हे, तर तो टिकवणे, वाढवणे आणि सामाजिक हित लक्षात घेऊन पुढे नेणे हे खरे उद्योजकतेचे लक्षण आहे,” असे त्यांनी सांगितले.
![]() |
| - Advertisement - |
प्रमुख वक्त्यांचे अनुभवाधारित मार्गदर्शन
कार्यक्रमात प्रमुख वक्त्या म्हणून ‘कोमल मसाले’ या यशस्वी उद्योग समूहाच्या संचालिका योगिता सोनवणे यांनी आपला प्रेरणादायी प्रवास मांडला. त्यांनी मसाल्याची गुणवत्ता, ब्रँड उभारणी, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संधी व आव्हाने याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांच्या अनुभवातून उपस्थित उद्योजकांना अनेक नव्या संकल्पना व दिशा मिळाल्या.
यशस्वी उद्योजकांचा सन्मान
कार्यक्रमाच्या शेवटी योगिता व सुधीर सोनवणे यांचा त्यांच्या उद्योगातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल सत्कार करण्यात आला. तसेच कालिका देवी संस्थान तर्फे सामाजिक कार्यात मोलाचा वाटा उचलल्याबद्दल संचालक भरत पाटील यांचा देखील सन्मान करण्यात आला.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
कार्यक्रमाची सांगता
कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन दीपक भदाणे यांनी केले, तर आभार प्रदर्शन सचिन टिपाले यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
धुळे दर्पण
मुख्य संपादक : सैय्यद सानिल
(B.Com, M.Com, M.A.MCJ)
📞 बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 8087860039 / 8806680480
📩 ईमेल : dhuledarpan@gmail.com
– धुळे दर्पण –
(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)
(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)
तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम
![]() |
| - Advertisement - |



