धुळे दर्पण न्यूज :- महाराष्ट्र राज्य लघवेतन सरकारी कर्मचारी संघ, मंत्रालय मुंबई यांच्या वतीने आज दिनांक ८ जुलै २०२५ रोजी मंगळवार, श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, धुळे येथील कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी व समस्या यावर चर्चा करण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीस संघटनेचे प्रदेशाध्यक्ष श्री गिरीश भाऊ चौधरी यांनी अध्यक्षता केली.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
या बैठकीमध्ये कर्मचाऱ्यांच्या अनेक महत्त्वाच्या मागण्यांवर सविस्तर चर्चा झाली. मागण्यांमध्ये प्रामुख्याने पुढील मुद्द्यांचा समावेश होता:
![]() |
| - Advertisement - |
या सर्व मागण्यांवर चर्चा झाल्यानंतर संघटनेच्या वतीने लवकरच अधिष्ठाता डॉ. सयाजी भामरे यांना अधिकृत निवेदन देण्यात येईल, असे आश्वासन संघटनेचे प्रदेशाध्यक्ष श्री गिरीश भाऊ चौधरी यांनी कर्मचाऱ्यांना दिले.
या बैठकीस राज्य कोषाध्यक्ष श्री चंद्रकांत भदाणे, राज्य विभागीय सचिव श्री विनोद सोनार, राज्य विभागीय महिला सचिव श्रीमती कांताबाई वरपे, धुळे जिल्हा उपाध्यक्ष श्री विजय बाविस्कर, सफाईगार संघटनेचे अध्यक्ष श्री हिरालाल डोंगरे, धुळे जिल्हा खजिनदार श्री प्रदीप गरुड, तसेच श्री संजय खैरनार, श्री संजू माळी, श्री नारायण चौधरी, श्री सोमनाथ सोनार, श्री आशिष सोनवणे, शाबुद्दीन शेख, श्री रामदास गोयर, श्री राहुल वाघ, श्री उदय मोरे, श्री भगवान पाटील, श्री सुनील टोपे, श्री राधेश्याम, श्री अमोल भंडारी, साहेबराव पाटील, श्री देवा करनकाळ, श्री कडवादास सूर्यवंशी, श्री गजानन सुराशे, श्री अज्जू लोखंडे, श्री सुरज पवार, श्री आकाश पंडित, श्री सावंत पवार, श्री दुर्गेश निगसे, श्री अनिल गोयर, तसेच महिला प्रतिनिधी म्हणून श्रीमती मिनाबाई गायकवाड, श्रीमती हेमलताबाई सोनार, श्रीमती कल्पना सावळे, श्रीमती चंद्रकला चावरे, श्रीमती अनिताबाई लोहरे व इतर अनेक वर्ग तीन व वर्ग चार कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी संघटना नेहमीच भक्कमपणे उभी राहील, असे सांगून बैठकीचा समारोप करण्यात आला.


