दत्त मंदिर चौक व शिवतीर्थ चौकातील सिग्नलची यंत्रणेकडून चाचणी सुरू; गिंदोडिया व कमलाबाई चौकातही सिग्नल लवकरच सुरू होणार
धुळे दर्पण न्यूज :- शहरातील वाढत्या वाहतुकीच्या गतीला नियमन देण्यासाठी अखेर महापालिकेने ठोस पावले उचलली आहेत. गेल्या काही वर्षांपासून तांत्रिक बिघाड व देखभाल दुरुस्तीअभावी बंद असलेले शहरातील मुख्य चौकातील वाहतूक सिग्नल पुन्हा कार्यान्वित करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. येत्या आठ दिवसांत दत्त मंदिर चौक, शिवतीर्थ चौक, गिंदोडिया चौक व कमलाबाई चौक या चारही महत्त्वपूर्ण चौकांमध्ये सिग्नल कार्यान्वित होणार असल्याची माहिती मनपा आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे पाटील यांनी दिली.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
शिवतीर्थ चौक हा शहरातील मोठ्या वाहतुकीचा चौक असून येथे प्रचंड गर्दी राहते. त्याचबरोबर पारोळा रोडवरील कमलाबाई चौक हा शैक्षणिक चौक असल्याने शाळा–महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह नागरिकांची मोठी वर्दळ असते. या दोन्ही ठिकाणी आधीच सिग्नल बसवण्यात आले आहेत, परंतु तांत्रिक बिघाडामुळे ते कार्यान्वित नव्हते. महापालिकेने आता या सिग्नलची यंत्रणेकडून चाचणी सुरू केली आहे. लवकरच गिंदोडिया चौकातही सिग्नल सुरू केला जाणार आहे.
![]() |
| - Advertisement - |
🛣 रणसिंग चौकाला सिग्नलपासून वंचितच राहावे लागणार
शहरातील सर्वाधिक गर्दीचा चौक म्हणजे आग्रारोडवरील रणसिंग चौक. येथे पायी चालणाऱ्यांची व वाहनांची प्रचंड वर्दळ असते. मात्र, रस्त्याची रुंदी कमी व रस्ते दुहेरी नसल्याने येथे सिग्नल कार्यान्वित करणे तांत्रिकदृष्ट्या शक्य नसल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. सिग्नल सुरू केल्यावर वाहनधारकांना एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे जाण्यासाठी योग्य रचना नसल्याने हे शक्य नाही.
💡 सिग्नलसाठी २४ लाखांचा खर्च
महापालिकेने शहरातील प्रमुख चौकांमध्ये एलईडी सिग्नल यंत्रणा बसवण्यासाठी व देखभाल दुरुस्तीसाठी २०२०–२१ मध्ये तब्बल २४ लाख रुपये खर्च केले आहेत. या सिग्नलमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून वाहतुकीची दिशानिहाय शिस्त राखली जाणार आहे. चौकातील वाहतूक भार लक्षात घेऊन सिग्नलची वेळ ठरवण्यात येणार आहे. ४० सेकंद ते दीड मिनिट इतका वेळ सिग्नल राहील. तसेच सकाळी ९ ते रात्री १० या कालावधीत सिग्नल कार्यरत असतील.
![]() |
| - Advertisement - |
🤝 पोलिस विभागासोबत समन्वय
वाहतुकीचे योग्य नियोजन करण्यासाठी महापालिकेने पोलिस विभागासोबत समन्वय साधला आहे. सिग्नल दुरुस्ती व देखभाल यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. "शहरातील वाहतुक सुरळीत होण्यासाठी व नागरिकांना शिस्त लागण्यासाठी सिग्नल सुरू करण्यावर भर देण्यात आला आहे. सध्या लवकरात लवकर सिग्नल सुरु करण्यास प्राधान्य देण्यात आले असून नंतर देखभाल व दुरुस्तीसाठीही ठोस पावले उचलली जातील," अशी माहिती आयुक्त अमिता दगडे पाटील यांनी दिली.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
✅ शहरातील वाहतूक शिस्तबद्ध होण्याची अपेक्षा
महापालिकेच्या या निर्णयामुळे शहरातील वाहतूक सुरळीत होईल, अपघातांचे प्रमाण कमी होईल, तसेच वाहतुकीत शिस्त येईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. नागरिकांनी सिग्नलचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
धुळे दर्पण
मुख्य संपादक : सैय्यद सानिल
(B.Com, M.Com, M.A.MCJ)
📞 बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 8087860039 / 8806680480
📩 ईमेल : dhuledarpan@gmail.com
– धुळे दर्पण –
(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)
(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)
तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम
![]() |
| - Advertisement - |



